दाभोळकरांच्या खुन्यांची ओळख पटली.. साक्षीदाराकडून महत्त्वाची साक्ष

दाभोळकरांच्या खुन्यांची ओळख पटली.. साक्षीदाराकडून महत्त्वाची साक्ष l Narendra Dabholkar murder case witness Identified attackers in court Pune
दाभोळकरांच्या खुन्यांची ओळख पटली.. साक्षीदाराकडून महत्त्वाची साक्ष l Narendra Dabholkar murder case witness Identified attackers in court Pune
Share on Social Sites

पुणे l Pune :

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Late president of Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti, Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्या प्रकरणा संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणी आज पुणे न्यायालयात साक्षीदारासमोर आरोपीची ओळख परेड झाली. आरोपी सचिन अंदुरे (Sachin Andure) आणि शरद कळसकर (Sharad Kalaskar) यांना खून करताना पाहिले, अशी साक्ष साक्षीदाराने दिली आहे.

या प्रकरणी आज न्यायालयात निम्मी ओळख परेड झाली. उर्वरित पुढील ओळख परेड ही दि. 23 मार्चला होईल. या प्रकरणी वीरेंद्र तांवडे (Virendra Tanwade), सचिन अंदुरे (Sachin Andure), शरद कळसकर (Sharad Kalaskar), विक्रम भावे (Vikram Bhave) आणि संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) आरोपी आहेत. यातील संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) वगळता सर्व चार आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते. हत्येतील पाच आरोपींवर शिवाजीनगर येथील नावंदर कोर्टात (Navandar Court in Shivajinagar) सी.बी.आय (CBI) मार्फत 15 सप्टेंबर 2021 रोजी आरोपपत्र निश्चित झाले आहेत.

Video : ‘मान’ गये उस्ताद! पहिल्याच कॅबिनेटमध्ये 25 हजार पदे भरण्याचे Bhagwant Mann यांचे आदेश

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी दोन आरोपींनी हत्या केली होती. पुण्याच्या शनिवार पेठेतील (Shaniwar Pethe in Pune) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (Maharshi Vitthal Ramji Shinde) पुलावर दाभोलकरांवर गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यासह देश हादरला होता.

दाभोलकरांचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम संपूर्ण देशभरात पोहोचले होते. त्यामुळे त्यांच्या हत्येच्या घटनेमुळे देशभरातील नागरिकांना धक्का बसला होता. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांकडे तपास होता. त्यानंतर सीबीआयकडून तपास सुरु होता. तपासाला अनेकवर्ष लागली. त्यानंतर काही आरोपींना पकडण्यात तपास यंत्रणांना यश आले होते. अखेर दि. 15 सप्टेंबरला आरोपपत्र निश्चित झाले होते. या प्रकरणी कोर्टात खटला सुरु होता.

बस पलटून भीषण अपघात, विद्यार्थ्यांसह 8 जणांचा मृत्यू; 20 जखमी

नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar Murder Update) यांची ज्याक्षणी हत्या करण्यात आली त्याचवेळी या प्रकरणातील साक्षीदार हे शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर साफसफाई करीत होते. साक्षीदाराची महिला सहकारी देखील त्यावेळी तिथे उपस्थि होती. साफसफाईचे काम झाल्यानंतर ते पुलाच्या डिव्हाडरवर बसले होते.

पुलाजवळील झाडावर एक माकड आल्याने आणि त्यामुळे कावळ्यांचा आवाज आल्याने त्यांनी त्या बाजूला पाहिले. तेव्हा त्यांना दोघांनी एका व्यक्तीवर गोळीबार करताना पाहिले. या गोळीबारात ज्या व्यक्तीवर हल्ला झाला ती व्यक्ती जमीनीवर पडल्याचे त्यांनी दिसले. आरोपी हल्ला करुन पोलीस चौकीच्या बाजूला पळाले होते. त्यानंतर ते दुचाकीवरुन पळून गेले होते.

सावधान! जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला; ‘अशी’ घ्या काळजी

See also  Maratha Reservation : ठरलं! मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती 'या' तारखे पासून आमरण उपोषण करणार

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Video : खळबळजनक! 'रशियन सैनिक भारतीय मुलींना घेऊन गेलेत', विद्यार्थिनीची आपबीती

Share on Social Sites