Video : ‘मान’ गये उस्ताद! पहिल्याच कॅबिनेटमध्ये 25 हजार पदे भरण्याचे Bhagwant Mann यांचे आदेश

'मान’ गये उस्ताद! पहिल्याच कॅबिनेटमध्ये 25 हजार पदे भरण्याचे Bhagwant Mann यांचे आदेश l Punjab cabinet has approved 25000 Government job vacancies in first Cabinet meeting
'मान’ गये उस्ताद! पहिल्याच कॅबिनेटमध्ये 25 हजार पदे भरण्याचे Bhagwant Mann यांचे आदेश l Punjab cabinet has approved 25000 Government job vacancies in first Cabinet meeting
Share on Social Sites

नवी दिल्ली l New Delhi :

पंजाब विधानसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवल्यानंतर राज्यात आम आदमी पार्टीचे (आप) (Aam Aadmi Party (AAP) सरकार स्थापन झाले आहे. शनिवारी मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठक (AAP Punjab Cabinet Meeting) घेतली.

या बैठकीत आज (दि. 19) शपथ घेतलेल्या दहा नव्या चेहऱ्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. याआधी दि. 16 मार्चला म्हणजे तीन दिवसांपूर्वी भगवंत मान यांनी शहीद भगतसिंग (Shaheed Bhagat Singh) यांच्या गावात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

दाभोळकरांच्या खुन्यांची ओळख पटली.. साक्षीदाराकडून महत्त्वाची साक्ष

दरम्यान, मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) शपथ घेतल्यापासून कृतीत दिसत आहेत. भगवंत मान यांनी आपल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पंजाबमधील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. शनिवारी (दि. 19) नव्या मंत्र्यांसोबतच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत त्यांनी महिन्याभरात 25 हजार सरकारी नोकऱ्या (25,000 government jobs in Punjab) देण्याची मोठी घोषणा केली आहे.

भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत 25 हजार पदे तातडीने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. यामध्ये 10 हजार पदे पोलीस विभागातील (Police Department) तर 15 हजार पदे अन्य शासकीय विभागातील (Government Departments) असतील. या भरतीमध्ये मंडळ आणि महामंडळ विभागाची पदेही भरली जाणार आहेत. तसेच, राज्याचे नवे सरकार आपला पहिला अर्थसंकल्प (Punjab Budget) जून महिन्यात सादर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

तत्पूर्वी, शनिवारी सकाळी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात एका महिलेसह आम आदमी पार्टीच्या (आप) दहा आमदारांचा समावेश करण्यात आला. पंजाब भवन (Punjab Bhavan) येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Governor Banwarilal Purohit) यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या 10 मंत्र्यांपैकी आठ पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. या सर्वांनी पंजाबी भाषेत (Punjabi language) शपथ घेतली.

सावधान! जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला; ‘अशी’ घ्या काळजी

भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होणार्‍या 10 मंत्र्यांमध्ये हरपाल सिंग चीमा (Harpal Singh Cheema), डॉ. बलजीत कौर (Dr. Baljit Kaur), हरभजन सिंग ईटीओ (Harbhajan Singh ETO), डॉ. विजय सिंगला (Dr. Vijay Singla), गुरमिर सिंग मीत हायर (Gurmeet Singh Meet Hayer), हरजोत सिंग बैंस (Harjot Singh Bains), लाल चंद कटारुचक (Lal Chand Kataruchak), कुलदीप सिंग धालीवाल (Kuldeep Singh Dhaliwal), लालजीत सिंग भुल्लर (Kuldeep Singh Dhaliwal), ब्रह्म शंकर झिंपा (Brahma Shankar Zimpa) यांचा समावेश आहे. परंतू ज्या आमदारांनी मोठमोठ्या हस्तींना हरविण्याची किमया साधली त्यांना मंत्रिपद मिळालेले नाही.

कुलतार सिंग संधवान विधानसभा अध्यक्ष (Kultar Singh Sandhwan As Assembly Speaker)

नियमांनुसार भगवंत मान आपल्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 17 मंत्री नेमू शकतात. पंजाब विधानसभेत 117 सदस्य आहेत. कोटकपुरा (Kotakpura) येथून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले कुलतार सिंग संधवान (Kultar Singh Sandhwan) हे पंजाब विधानसभेचे अध्यक्ष असणार आहेत.

बस पलटून भीषण अपघात, विद्यार्थ्यांसह 8 जणांचा मृत्यू; 20 जखमी

See also  17 साल की इंटरनेशनल स्तर की शूटर खिलाड़ी ने किया सुसाइड, बंद कमरे में मिली लाश

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites