
पुणे l Pune :
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर आज (दि. १५) रोजी भीषण अपघात (Major accident on Mumbai-Pune Expressway) झाला आहे. सहा गाड्या एकमेकांना धडकल्याने विचित्र अपघात (six vehicle rammed into each other) झाला आहे.
या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या लेनवरील खोपोली जवळ हा भीषण अपघात (Accident near Khopoli) झाला आहे.
कार, कंटेनरसह चार वाहनांचा अपघात झाला आहे. दोन कंटेनरच्या मधोमध कार अडकल्याने अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, चार जणांचा जागीच मत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे आणि पाच किरकोळ जखमी झाले आहे.
सौ बात की एक बात : आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?; वाचा सविस्तर
जखमींना पनवेलच्या एम जी एम रूग्णालयात (MGM Hospital, Panvel) दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा दल (Maharashtra Security Force), देवदूत रेस्क्यू टीम (Devdoot Rescue Team) आणि खोपोली (Khopoli), खंडाळा (Khandala), महामार्ग पोलीस दाखल झाले आहेत. या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्याप या अपघाताचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही.
Maratha Reservation : ठरलं! मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती ‘या’ तारखे पासून आमरण उपोषण करणार