‘द बर्निंग ओला स्कूटर’; पाहा भयावह Viral Video

इलेक्ट्रिक बाईक्स पेटण्यामागे 'हा' तांत्रिक बिघाड; केंद्रीय समितीच्या अहवालात सापडलं मोठं कारण
इलेक्ट्रिक बाईक्स पेटण्यामागे 'हा' तांत्रिक बिघाड; केंद्रीय समितीच्या अहवालात सापडलं मोठं कारण
Share on Social Sites

पुणे l Pune :

पेट्रोल, डिझेलच्या दिवसेंदिवस (Petrol Diesel Price Hike) चढ्या किंमतीत देशातील वातावरण तापलेले असताना ‘ओला’ ने (Ola Scooter) गरम तव्यावर मस्त भाकरी भाजून घेतली होती. अर्धवट तयारी करत भारतीयांना इलेक्ट्रीक स्कूटरचे (Electric Scooter) सुंदर स्वप्न दाखविले होते.

भारतीय देखील खिशाला आग लागल्याने या स्कूटरवर अक्षरश: तुटून पडले होते. परंतू ओलाने त्यांच्या भावनांशी खेळत अर्ध्या मुर्ध्या स्कूटर माथी मारल्या होत्या. एकेका ग्राहकाला महिनोंमहिने वाट पहावी लागली होती, तर अनेकांना स्कूटर मिळाली तरी महिनाभरातच दोन-तीन वेळा समस्यांमुळे टो करून सर्व्हिस सेंटरमध्ये न्यावी लागली होती.

इलेक्ट्रिक बाईक्स पेटण्यामागे ‘हा’ तांत्रिक बिघाड; केंद्रीय समितीच्या अहवालात सापडलं मोठं कारण

हे कमी की काय म्हणून आज (दि. 27) एक भयावह व्हिडीओ सोशल मीडियावर आला आहे. (Ola scooter Viral Video) या व्हायरल व्हिडीओमध्ये सव्वा ते दीड लाखाची ही ओला एस १ प्रो इलेक्ट्रीक स्कूटर (Ola S1 Pro electric scooter) भररस्त्यात धु-धु पेटली आहे. यामुळे ओलाच्या स्कूटर किती सुरक्षित आहेत, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video on Social Media) तुफान शेअर होऊ लागला आहे. यामध्ये ओलाच्या स्कूटरला आग लागली आहे आणि ती जळाली देखील आहे. ओला एस १ प्रो (Ola S1 Pro) रस्त्याच्या शेजारी उभी केलेली दिसत आहे. माहितीनुसार ही स्कूटर पुण्यातील धानोरी (Dhanori, Pune) भागातील आहे. या व्हिडीओनंतर ओलाने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत स्कूटरच्या मालका बचावला आहे. या आगीच्या कारणांचा शोध घेतला जाईल, यानंतर ही माहिती सार्वजनिक केली जाईल असे ओला कंपनीने म्हटले आहे. (Ola S1 Pro electric scooter catches fire in Pune)

वाहनाची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून, स्कूटरमध्ये चांगल्या दर्जाची उत्पादने वापरली जातात. आम्ही ही घटना गांभीर्याने घेतली असून योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे, असे ओलाने म्हटले आहे. लिथियम-आयन बॅटरीचे नुकसान किंवा शॉर्ट सर्किटमुळे असे घडले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे.

See also  'अभिनव भारत' निधी श्रेयासाठी खा. हेमंत गोडसे यांचा केविलवाणा प्रयत्न; आ. फरांदे यांचा थेट आरोप

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  सारे काही सत्तेसाठीच! राज्यातील सत्तासंघर्षात आता फक्त 'हे' दोनच पर्याय शिल्लक

Share on Social Sites