
हिंगोली l Hingoli :
जिल्ह्यातील औंढा नागनाथ (Aundha Nagnath) याठिकाणी वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका डॉक्टरने तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलेसोबत लैंगिक चाळे (Sexual Molestation) केले आहेत.
पीडित महिलेनं संबंधित संतापजनक घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना दिल्यानंतर, पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत संशयित आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गणेश बंडेवार (Ganesh Bandevar) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव असून काल (रविवारी) गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय पीडित महिला चार महिन्यांची गरोदर होती. गेल्या शनिवारी अचानक त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे पीडित महिला रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आपल्या एका नातेवाईकाला घेऊन, औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात (Aundha Nagnath Rural Hospital) तपासणीसाठी गेली होती.
खळबळजनक! व्हिडीओ शूट करत ३ जवानांचा महिलेवर सामूहिक बलात्कार