Online शिक्षणाचा आणखी एक बळी; विद्यार्थिनीची शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या

Online शिक्षणाचा आणखी एक बळी; विद्यार्थिनीची शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या l Student commits suicide by hanging under pressure of online education surgana nashik
Online शिक्षणाचा आणखी एक बळी; विद्यार्थिनीची शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या l Student commits suicide by hanging under pressure of online education surgana nashik
Share on Social Sites

सुरगाणा l Surgana :

ऑनलाईन अभ्यासात (Online Education) अडचणी येत असल्याने एका अकरावीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक घटना सुरगाण्यातील अलंगुण येथे घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा जिल्हा हादरला असून ऑनलाईन शिक्षण फायद्याचे की तोट्याचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कोरोनामुळे सर्वात जास्त नुकसान विद्यार्थी आणि लहान मुलांचे झाले आहे. शाळा आणि महाविद्यालये सतत बंद असल्याने त्यांच्या अभ्यासात नाना विघ्न येत असल्याचे पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आले आहे.

साखर कारखाना विक्रीत २५ हजार कोटींचा घोटाळा; अण्णा हजारे यांचे अमित शहांना पत्र

शाळेतच घेतला गळफास (She hanged her self in the school)

अलंगुण (Alangun) येथील पोस्ट बेसिक अनुदानित आश्रमशाळेत ही विद्यार्थिनी अकरावी विज्ञान शाखेत (Science Branch) शिकत होती. सोमवारपासून पहिली ते बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र, या विद्यार्थिकडे स्वतःचा मोबाईल नव्हता. त्यामुळे ऑनलाईन क्लास आणि अभ्यासामध्ये ती इतर विद्यार्थ्यांपेक्षा मागे पडलेली होती. इतरांचा मोबाईल घेऊन ती ऑनलाईन क्लासेस करायची.

मात्र, त्यानंतरही तिचा अभ्यास पूर्ण झाला नाही. त्यामुळे वाढलेला अभ्यास आणि सुरू झालेली शाळा याचा ताण तिला सहन झाला नाही. अखेर तिने काल (दि. २४ जानेवारी) सोमवारी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

See also  १२वी च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! पेपर फुटला नाही, फक्त..., शिक्षणमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites