MPSC Recruitment 2022 : ‘एमपीएससी’ची मेगा भरती; ‘पीएसआय’च्या तब्बल 603 जागा

Latest MPSC Recruitment News
Share on Social Sites

मुंबई । Mumbai :

एमपीएससीतर्फे (Maharashtra Public Service Commission MPSC) विविध संवर्गातील एकूण 800 पदांची मेगा भरती होणार असून त्यासाठी आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (Maharashtra Secondary Services Non-Gazetted, Group-B Joint Preliminary Examination 2022) ही येत्या दि. 8 ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहेत. (MPSC Mega Recruitment 603 PSI Posts)

800 पदांच्या भरती प्रक्रियेत सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक कक्ष अधिकारी (Assistant Room Officer), गट- ब या संवर्गातील 42 पदांची भरती होईल. तर वित्त विभागांतर्गत राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) 77 पदे, गृह विभागातील पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector) 603 पदे, महसूल (Revenue) व वन विभागांतर्गत दुय्यम निबंधक (Forest Department), मुद्रांक निरीक्षक (Stamp Inspector), 78 पदे असे एकूण 800 पदांची भरती होणार आहे.

See also  Video : पुण्यात जबर राडा; शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पडले पायरीवर

विशेष म्हणजे, दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक (Sub Registrar and Inspector of Stamp) हे पद पहिल्यांदा एमपीएससीद्वारे भरले जात आहे. पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षा डिसेंबर 2022 नंतर होईल. पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी तर मुख्य परीक्षा 400 गुणांसाठी होईल.

See also  Maratha Reservation : ठरलं! मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती 'या' तारखे पासून आमरण उपोषण करणार

Share on Social Sites