
नवी दिल्ली l New Delhi :
पंजाब काँग्रेस नेते अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Punjab Congress leader Navjyot Singh Sidhu) यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1988 च्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. (Congress’s Navjot Sidhu Gets 1 Year In Jail In 34-Year-Old Road Rage Case)
रोड रेज प्रकरणी नवज्योतसिंग सिद्धूच्या शिक्षेत वाढ करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.
https://twitter.com/AdagaleSebastin/status/1527215167745843200
काय आहे प्रकरण?
पटियाला येथे 1988 मध्ये नवज्योत सिद्धू यांच्यात पार्किंगवरून भांडण झाले होते ज्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्याविरोधात पीडित पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. दि. 27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू त्याचा मित्र रुपिंदर सिंग संधूसोबत (Rupinder Singh Sandhu) पटियालाच्या शेरावले गेटच्या (Sherawale Gate) बाजारात पोहोचले. हे ठिकाण त्यांच्या घरापासून 1.5 किमी अंतरावर आहे. तेव्हा सिद्धू क्रिकेटपटू होते. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू होऊन फक्त एक वर्ष झाले होते.
त्याच मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंग (Gurnam Singh) यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धूने गुरनाम सिंगला गुडघ्यावर पाडले. त्यानंतर गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त आले होते.
Reham, #ImranKhan's wife wants India to adopt him.
– Navjyot Sidhu & IK are friends & so Kapil Sharma should take him & his cabinet in his K9 show.
– Will win Oscars for Bollywood.
Fraud #Pakistan#JagoKashmir pic.twitter.com/ayHakkgAUc— Aatifa_Bandipore (@ABandipore) April 10, 2022
त्याच दिवशी सिद्धू आणि त्याचा मित्र रुपिंदर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali police station) निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायालयात खटला चालला. 1999 मध्ये सत्र न्यायालयाने हा खटला फेटाळून लावला. 2002 मध्ये पंजाब सरकारने सिद्धूविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. दरम्यान, सिद्धू यांनी राजकारणात प्रवेश केला. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election) त्यांनी भाजपच्या (BJP) तिकिटावर अमृतसरची (Amritsar) जागा लढवली आणि जिंकली.
https://ekhabarbat.com/domestic-lpg-cylinder-costlier-by-rs-3-50-commercial-cylinder-hiked-by-rs-8-check-rates-here/
उच्च न्यायालयाचा निर्णय डिसेंबर 2006 मध्ये आला होता. उच्च न्यायालयाने सिद्धू आणि संधूला दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. सिद्धू यांनी लोकसभेचा राजीनामा दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान देण्यात आले. भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली (BJP leader Arun Jaitley) यांनी सिद्धूच्या वतीने खटला लढवला होता. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. 2007 मध्ये सिद्धू पुन्हा अमृतसरमधून निवडणूक जिंकले.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
'शिंदे सरकार'मधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; 'भाजप'कडून नव्या चेहऱ्...
सभागृहातच सत्ताधारी-विरोधकांची तुफान फटकेबाजी; पाहा कोण काय-काय म्हणतंय ?
राजधानीत आगडोंब! 27 लोक जिवंत जळाले, आगीच्या ज्वाळांनी आयुष्य बेचिराख; अनेक अजून...
वाढदिवसाच्या पार्टीने केला घात.. दोघांचा जागीच मृत्यू; खान्देशातील घटना