
पुणे l Pune :
निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले (Retired Union Home Secretary Madhav Godbole) यांचे निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. हृदयक्रिया बंद झाल्याने (Cardiac failure) त्यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी सुजाता, मुलगा राहुल, मुलगी मीरा, सून दक्षिणा, जावई महेश आणि नातवंडे आदिती, मनन, गायत्री आणि तारिणी असा परिवार आहे. डॉ. माधव गोडबोले हे भारतीय प्रशासकीय अधिकारी (निवृत्त) होते.
त्यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून (Williams College, USA) विकासाचे अर्थशास्त्र (Economics) या विषयात एम. ए. व पीएच. डी. या पदव्या प्राप्त केल्या. 1959 साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला व मार्च 1993 मध्ये भारताच्या केंद्र सरकारचे गृहसचिव व न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव (Secretary, Ministry of Petroleum and Natural Gas) व नगरविकास मंत्रालयाचे सचिव (Secretary, Ministry of Urban Development) म्हणून कामे केली होती.
https://twitter.com/ANI/status/1518488257872666624
विविध समित्यांचे अध्यक्ष
माधव गोडबोले यांनी महाराष्ट्र राज्याच्या शासनात मुख्य वित्तसचिव म्हणून काम केले होते. गोडबोले हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्ष होते. याशिवाय, त्यांनी मनिला येथील आशियाई विकास बँकेत (Asian Development Bank) पाच वर्षे काम केले. सेवानिवृत्तीनंतर गोडबोले यांनी विविध समित्यांचेदेखील काम पाहिले.
मोठी कारवाई! 9 जणांसह पाकिस्तानी बोट पकडली, तब्बल 280 कोटींचे ‘हेरॉईन’ जप्त
अनेक पुस्तकांचे लेखन
माधव गोडबोले लेखकही होते. ऑक्टोबर 2019 पर्यंत माधवराव गोडबोले यांनी 15 इंग्रजी आणि 10 मराठी पुस्तके लिहिली. ‘चांगले प्रशासन हा मूलभूत हक्क मानला जावा’ यासाठी त्यांनी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आधारित A Quest For Good Governance (2004) या पुस्तिकेचे ते सहलेखकही आहेत. त्यांचे The Judiciary and Governnace in India हे पुस्तक जानेवारी 2009मध्ये प्रकाशित झाले व त्यानंतर India’s Parliamentary Democracy on Trial हे पुस्तक 2011 साली प्रसिद्ध झाले.
KGF Chapter 2 : ‘रॉकीभाई’ ची रॉकिंग कमाई! ‘केजीएफ चॅप्टर 2’ ने पार केला कमाईचा थक्क करणारा आकडा