एसटी संप जीवावर बेतला! नाशिकमध्ये आणखी एका कर्मचाऱ्याची आत्महत्या

एसटी संप जीवावर बेतला! नाशिकमध्ये आणखी एका कर्मचाऱ्याची आत्महत्या l ST employee commits suicide in Nashik
एसटी संप जीवावर बेतला! नाशिकमध्ये आणखी एका कर्मचाऱ्याची आत्महत्या l ST employee commits suicide in Nashik
Share on Social Sites

नाशिक l Nashik :

दिवाळीपासून संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे चार-चार महिने पगार न मिळता, कमी पैशांमध्ये राब-राब राबलेल्या संपकऱ्यांचा आता धीर सुटत चालला आहे.

त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा नाशिकमध्ये (Nashik) आला असून, आणखी एका कर्मचाऱ्याने (ST Employee Suicide) गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शिवनाथ कापाडे (Shivnath Kapade) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

नाशकातील शिवनाथ कापाडे हे गेल्या आठ वर्षांपासून शहापूर आगारात (Shahapur Agar) नोकरीला होते. गेल्या चार महिन्यांपासून इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे ते सुद्ध एसटीच्या विलीनीकरणासाठी आंदोलनात उतरले.

त्यामुळे आधीच बिकट असलेली आर्थिक परिस्थिती आणखी खालावली. दुसरीकडे हाताला काम नाही. सरकार नमते घेत नाही. हे सारे पाहता त्यांनी गळफास घेऊन शेवटी आत्महत्या केली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महामंडळाचे विलिनीकरण नाहीच; एसटी कर्मचार्‍यांना मोठा धक्का : ‘या’ तीन प्रमुख मुद्द्यांची ढाल

See also  'जय महाराष्ट्र' म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अखेर राजीनामा

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites