संजय राऊतांचा विरोधकांवर घणाघात; मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे ‘नामर्द’

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आजारपणावर टीका करणारे नामर्द आहेत, अशी जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे l Shivsena MP Sanjay Raut
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आजारपणावर टीका करणारे नामर्द आहेत, अशी जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे l Shivsena MP Sanjay Raut
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या आजारपणावर टीका करणारे नामर्द आहेत, अशी जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी केली.

राऊत म्हणाले की, आजारपण हे कधी कोणावर येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर आजारपणाच्या काळात झालेली टीका ही माणुसकी आणि नीतीमत्तेला धरुन नव्हती. विरोधक नामर्दपणे मुख्यमंत्र्यांवर टीका करत राहिले. राज्यातील जनतेने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर मुख्यमंत्री शिवतीर्थावरील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमालाही उपस्थित होते. त्यामुळे राज्यातील जनता उत्साहात आहे.

मात्र, ज्या कोणी मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावरुन टीकाटिप्णी केली आहे, त्यांच्या अंतरंगात किती घाण आहे, हे दिसून आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते आज (दि. २६ जानेवारी) बुधवारी मुंबईत बोलत होते.

दुर्दैवी! शाळेत ध्वजारोहणावेळी विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी

बाळासाहेबांना पद्म पुरस्कार का दिला नाही?; राऊतांचा सवाल (Why Balasaheb was not given Padma award ?)

फडणवीसजी तुम्ही इतक्या लोकांना पद्म पुरस्कार देता, मग तुमच्या केंद्र सरकारला (Central Government) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना आजपर्यंत पद्मविभूषण (Padma Vibhushan) किंवा भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna) द्यावासा का वाटला नाही? याचा खुलासा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी करावा. मग आम्हाला राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या ट्विटवर बोलता येईल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

See also  Viral Video : कारची चावी कारमध्येच राहिली तर काय करावे... पाहा हा 'देसी जुगाड'

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  खळबळजनक! शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशीतैशी; चक्क शौचालयात धुतली जाताहेत जेवणाची भांडी : पाहा VIDEO

Share on Social Sites