घोटी : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची टाकेघोटी येथील बुद्धविहारास सदिच्छा भेट

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची टाकेघोटी (घोटी) येथील बुध्दाविहार आणि दलित वस्तीला सदिच्छा भेट दिली. l Education Minister Varsha Gaikwad visited Buddha Vihar at Takeghoti igatpuri ghoti
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची टाकेघोटी (घोटी) येथील बुध्दाविहार आणि दलित वस्तीला सदिच्छा भेट दिली. l Education Minister Varsha Gaikwad visited Buddha Vihar at Takeghoti igatpuri ghoti
Share on Social Sites

घोटी l Ghoti :

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज (दि. २२) रोजी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय शिबिरासाठी इगतपुरी तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या असता महामार्गवरील टाकेघोटी येथील बुध्दाविहार आणि दलित वस्तीला सदिच्छा भेट दिली आहे.

यावेळी त्यांचे स्वागत प्रभारी सरपंच मच्छिन्द्र दोंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी दलित वस्तीच्या विकासाबाबत चर्चा देखील केली. तसेच टाकेघोटी येथील बुध्दविहारातील तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आभिवादन केले.

सार्वजनिक शौचालय तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी; श्रमजीवी संघटनेचे अकोले पंचायत समितीला निवेदन

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पंडित, काँग्रेसचे जेष्ठ नेते देवधर, पवार साहेब, दीपक दोंदे, सुधाकर दोंदे, पिंटू पगारे यांच्यासह महिलांवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Online शिक्षणाचा आणखी एक बळी; विद्यार्थिनीची शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या


Share on Social Sites
See also  धक्कादायक! प्रेयसीच्या मुलीवर प्रियकराचा अनैसर्गिक अत्याचार; दोघेही होते Live in Relationship मध्ये