
जळगाव l Jalgaon :
शहरात थंडीच्या अति कडाक्याने काल (दि. ०१) सोमवारी रात्री चार जणांचा बळी गेला. हे चौघेही घर नसल्याने रस्त्याच्या कडेला झोपले होते. तपमान रात्री साडेसात अंशापर्यंत घसरले आणि गार वारेही सुटले.
धुळ्यात भीषण दुर्घटना; केमिकल टँकर आणि ट्रकच्या धडकेनंतर आगीचा भडका, दोघांचा होरपळून मृत्यू
त्यामुळे गारठून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असे प्रथमदर्शनी समोर आले आहे. भीक मागून हे चाैघे उदरनिर्वाह करत होते. त्यातील एक पांडे डेअरी चौकात (Pandey Dairy Chowk), एक निमखेडी रस्त्यावर (Nimkhedi Road) तर एक रेल्वे स्थानक परिसरात (Railway Station area) आढळून आला. एकाचा मृतदेह सायंकाळी जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या (District Peth Police Station) हद्दीत आढळून आला.
पोलीस बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे; देशमुख यांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात एकच खळबळ