सिंध प्रांत l Sindh Prant :
पाकिस्तानमधील (Pakistan) अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. सिंध प्रांतांमध्ये एका 18 वर्षीय मुलीवर भर रस्त्यावर गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आली आहे.
सुक्कुर शहरामधील रोही परिसरात (Rohi, Sukkur City) हा भयंकर अन धक्कादायक प्रकार घडला आहे. सुरुवातीला या तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो अयशस्वी ठरल्याने अपहरणकर्त्यांनी तिच्यावर थेट गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरुन पळ काढला. मृत्यू झालेल्या मुलीच नावं पुजा ओड (Pooja Oad) आहे. (Hell for minorities : 18-year-old Hindu girl Pooja Oad shot dead in the middle of the road for resisting an abduction attempt in Pakistan)
An 18-year-old Hindu girl, Pooja Oad, was reportedly shot dead in Rohi, Sukkur, during a failed abduction attempt. The girl was said to have been shot in the middle of the street after she put up resistance to the attackers: Pakistan media
— ANI (@ANI) March 22, 2022
पीपल्स कमिशन फॉर मायनॉरिटीज राइट्स (People’s Commission for Minority Rights) आणि सेंटर फॉर सोशल जस्टिसच्या (Center for Social Justice) म्हणण्यानुसार, पूजाचे आधी रस्त्यावर अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिने यासाठी विरोध केल्यावर हल्लेखोरांनी (Islamist) तिला रस्त्याच्या मध्यभागी गोळ्या घातल्या.
दरवर्षी अल्पसंख्याक (Minorities) समुदायातील, विशेषतः सिंधमधील महिलांचे अपहरण केले जाते आणि जबरदस्तीने त्यांचे धर्मांतरण करतात, असे वृत्त एका स्थानिक मीडियाने दिले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
https://twitter.com/rahulrajnews/status/1506081875290636288?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1506081875290636288%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fcrime%2Fcrime-news-hindu-girl-shot-dead-during-abduction-attempt-in-pakistan-a597%2F
पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायांना दीर्घकाळापासून जबरदस्तीने विवाह आणि धर्मांतराचा सामना करावा लागत आहे. सिंध प्रांतात धर्म परिवर्तन आणि जबरदस्तीने विवाह केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे. अशात आता पुन्हा एकदा असंच प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये एका 18 वर्षीय तरुणीवर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली आहे.
2013 ते 2019 या 6 वर्षाच्या कालावधीत धर्मांतराच्या 156 घटनांची नोंद झाली आहे. पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्येपैकी 1.60 टक्के हिंदू (Hindu) लोकसंख्या आहे. तर सिंध प्रांतामधील एकूण लोकसंख्येच्या 6.51 टक्के लोक हिंदू आहे.
काय सांगताय! होय, तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता Google या Apps द्वारे चोरी करतोय डेटा