धक्कादायक! ‘The Kashmir Files’ पाहून आलेल्या तरुणाचा मेंदूतील नस फुटून मृत्यू

धक्कादायक! 'The Kashmir Files' पाहून आलेल्या तरुणाचा मेंदूतील नस फुटून मृत्यू l Youth died after watching The Kashmir Files movie
धक्कादायक! 'The Kashmir Files' पाहून आलेल्या तरुणाचा मेंदूतील नस फुटून मृत्यू l Youth died after watching The Kashmir Files movie
Share on Social Sites

पिंपरी l Pimpri :

नुकताच प्रदर्शित झालेला बहुचर्चित ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट दिवसेंदिवस वादाचा विषय ठरत आहे. चित्रपटाच्या पटकथेवरून सोशल मीडियात राजकीय वाद (The Kashmir Files Controversial movie) टोकाला गेला आहे. अनेकांनी या चित्रपटावरून वादावादी देखील केली आहे.

VIDEO : राज्यात 1 एप्रिसपासून कोरोना निर्बंध मुक्तीची गुढी; जाणून घ्या मास्क, सोशल डिस्टन्सिंग पासून सुटका?

अशात पुण्यातील पिंपरी (Pune) परिसरातील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. संबंधित तरुण ‘द काश्मीर फाइल्स’ पाहून आल्यानंतर त्याला ‘ब्रेन स्ट्रोक’ (Brain Stroke) अर्थातच मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी फूटून त्याचा मृत्यू (Death) झाला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

अभिजित शशिकांत शिंदे (Abhijit Shashikant Shinde) असे मृत पावलेल्या 38 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchvad) परिसरातली लिंकरोड येथील रहिवासी आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याला ‘ब्रेन स्ट्रोक’ होऊन त्याचा मृत्यू झाला आहे.

सावधान! ‘The Kashmir Files’ बद्दल तुम्हाला लिंक आलीय का? पोलिसांनी दिली ‘हि’ माहिती

मिळालेल्या माहिती नुसार, मृत अभिजित याने दि. 21 मार्च रोजी रात्री आपल्या काही मित्रांसमवेत ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिला होता. चित्रपट पाहून आल्यानंतर सिनेमाविषयी मित्रांसोबत एक तास चर्चा देखील केली.

या चर्चेनंतर अभिजित घरी झोपायला गेला. दि. 22 मार्चला पहाटे त्याला ब्रेन स्ट्रोक आला. मेंदूला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी फुटल्याने तो बेशुद्ध झाला. सकाळी अभिजितचे वडील त्याच्या खोलीत गेले असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर कुटुंबीयांनी अभिजितला बेशुद्धावस्थेत त्वरित रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना (दि. 27) रविवारी रात्री अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘शरीरात रक्तदाब वाढल्यामुळे ब्रेक स्ट्रोक होण्याचा धोका वाढतो. चित्रपट पाहिल्यामुळेच अभिजितला ब्रेन स्ट्रोक झाला असं म्हणता येणार नाही. कोणत्याही घटनेमुळे रक्तदाब वाढू शकतो. शिवाय सकाळी झोपेत रक्तदाब कमी अधिक होत असतो.

त्याच वेळी व्यक्तींना ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका अधिक असतो.’ मृत अभिजित याला ब्रेन स्ट्रोक नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी, आदल्या रात्री ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिल्यामुळेच त्याच्यासोबत हा अनर्थ घडल्याचे बोलले जात आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; जाणून घ्या आजचे दर

See also  सहकार सुर्य मावळला; माजी मंत्री शंकरराव कोल्हे कालवश

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites