CWG 2022 : बॉक्सिंगमध्ये भारताची सुवर्ण हॅटट्रिक, निखत झरीनचाही ‘गोल्डन पंच’

Share on Social Sites

मुंबई | Mumbai :

बॉक्सिंगमध्ये भारताला आणखी एक यश मिळाले आहे. देशाची महिला बॉक्सर आणि विश्वविजेती निखत जरीनने (Female Boxer and World Champion Nikhat Zareen) आज (दि. 07) रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक (Commonwealth Games) पटकावले आहे. निखतने 51 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या कॅरी मॅकनॉलचा (Kerry McNall) 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे 48 वे आणि बॉक्सिंगमधील तिसरे सुवर्णपदक आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत निखतने प्रथमच भारताला पदक मिळवून दिले आहे. (India boxer Nikhat Zareen beats Mcnaul of Northern Ireland to win Gold in 48-50 Kg flyweight category)

पहिल्या राऊंडमध्ये निखतने वर्चस्व गाजवले. सर्व 5 पंचांकडून तिने 10 पैकी 10 गुण घेतले. दुसऱ्या राऊंडमध्ये ही निकाल निखतच्या बाजूनेच होता. तिसऱ्या राऊंडमध्ये तिने सातत्य राखत सुवर्णपदकावर आपली पकड मजबूत केली. निखतने तिच्यापेक्षा 7 वर्ष वयाने मोठ्या असलेल्या खेळाडूला थकवून बाजी मारली. 51 किलो वजनी गटात मेरी कोमने (Mary Kom) कधीकाळी वर्चस्व गाजवले होते.

कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) चा आज 10 वा दिवस आहे. आज बॉक्सिंगमध्ये नीतू, अमितनंतर निकतनेही सुवर्णपदक जिंकले आहे. भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर 17 सुवर्ण (Gold Medal), 12 रौप्य (Silver Medal) आणि 19 कांस्य (Bronze Medal) अशी एकूण 48 पदके जिंकली आहेत.

See also  चिंता वाढली; लता मंगेशकर यांच्या प्रकृती बद्दल रुग्णालयाने दिली 'ही' महत्वाची माहिती

https://twitter.com/Media_SAI/status/1556275062764109828?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1556275062764109828%7Ctwgr%5Ef3787d54e3339134a54314b1a94bc0e1b8d813d6%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fkrida%2Fnikhat-zareen-has-won-the-gold-medal-in-the-womens-48-50-kg-weight-category-in-boxing-kgm00

भारताची पदकसंख्या : 48 (India’s medal tally: 48)

  • 17 सुवर्ण : मीराबाई चानू (Meerabai Chanu), जेरेमी लालरिगुंना (Jeremy Lalriguna), अंचिता शेऊली (Anchita Shewli), महिला लॉन बॉल्स संघ (Lawn Bowls Team), टेबल टेनिस पुरूष संघ (Table Tennis Men’s Team), सुधीर (पॅरा वेटलिफ्टिंग) (Sudhir (Para Weightlifting), साक्षी मलिक (Sakshi Malik), बजरंग पुनिया (Bajrang Punia), दीपक पुनिया (Deepak Punia), रवी कुमार दहिया (Ravi Kumar Dahiya), विनेश फोगाट (Vinesh Phogat), नवीन, भाविना (पैरा टेबल टेनिस) (Bhavina (Para Table Tennis), नीतू घनघास (Neetu Ghanghas), अमित पंघाल (Amit Panghal), एल्डहॉस पॉल (Aldhaus Paul), निखत जरीन (Nikhat Zarin).

 

  • 12 रौप्य (12 Silver Medal) : संकेत सरगर (Sanket Sargar), बिंदियाराणी देवी (Bindiarani Devi), सुशिला देवी (Sushila Devi), विकास ठाकूर (Vikas Thakur), भारतीय बॅडमिंटन संघ (Indian Badminton Team), तुलिका मान (Tulika Mann), मुरली श्रीशंकर (Murali Srishankar), अंजू मलिक (Anju Malik), प्रियांका गोस्वामी (Priyanka Goswami), अविनाश साबळे (Avinash Sable), पुरूष लॉन बॉल्स संघ (Men’s Lawn Bowls), अब्दुल्ला अबोबैकर (Abdullah Abobaker).

 

  • 19 कांस्य (19 Bronze Medal) : गुरुराजा पुजारी (Gururaja Pujari), विजय कुमार यादव (Vijay Kumar Yadav), हरजिंदर कौर (Harjinder Kaur), लवप्रीत सिंग (Lovepreet Singh), लवप्रीत सिंह (Lovepreet Singh), गुरदीप सिंग (Gurdeep Singh), तेजस्वीन शंकर (Tejashwin Shankar), दिव्या काकरन (Divya Kakaran), मोहित ग्रेवाल (Mohit Grewal), जस्मिन (Jasmine), पूजा गेहलोत (Pooja Gehlot), पूजा सिहाग (Pooja Sihag), मोहम्मद हुसामुद्दीन (Mohammad Husamuddin), दीपक नेहरा (Deepak Nehra), रोहित टोकस (Rohit Tokas), महिला हॉकी संघ (women’s hockey team), सौरव घोषाल (Sourav Ghoshal), संदीप कुमार (Sandeep Kumar), अन्नू रानी (Annu Rani).
See also  जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, तब्बल 528 मतं मिळाली; मार्गारेट अल्वांना 182 मतं

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  मोठी बातमी : हिमस्खलनात सात जवान दबले; गस्तीवर असतानाच...

Share on Social Sites