
मुंबई l Mumbai (वि. प्र.) :
कारची चावी चुकून कारमध्ये राहून गेली आणि डोर लॉक झाला तर काय कराल? अशा वेळी घाबरण्याची गरज नाही. कारण काही सोप्या ट्रिक्स वापरुन आपण काही सेंकंदामध्ये दरवाचा उघडू शकतो.
अनेकदा कारची चावी चुकून गाडी मध्येच राहण्याचे प्रकार होत असतात. त्यात जवळपास कोणता मेकॅनिक उपलब्ध नसला म्हणजे झालंच! (How to Unlock Car door without Key)
अशा वेळी एकच गोंधळ उडतो. अशात काय करावं आणि काय नाही या दुविधेत प्रत्येक जण सापडतो. मग अशावेळी आपल्या जवळ उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करून एक ना अनेक प्रयत्न केले जातात. काही वेळा प्रयोग यशस्वी होतात तर काही वेळा नाही.
असाच एक व्हिडिओ सध्या मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Viral Video on Social Media) ज्यात काही माणसे मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनीच्या कारची ड्राईव्हर साईडची काच खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होतो देखील. बघुयात व्हिडिओत नेमकं यांनी काय शक्कल लढवली आहे ते…
प्रतीक्षा संपली! KTM RC 390 चे नवीन मॉडेल लाँच; जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरचं काही