![Grampanchayat Election Maharashtra Maharashtra Grampanchayat election 2022](https://ekhabarbat.com/wp-content/uploads/2022/08/Grampanchayat-Election-Maharashtra-678x381.jpg)
राज्यातील 608 ग्रामपंचायतींचे (Gram Panchayat) सदस्य तसेच सरपंच पदाची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी ही निवडणूक होणार असून दि. 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल. थेट जनतेतून यंदा सरपंच निवडले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान (State Election Commissioner UPS Madan) यांनी हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला. (General Elections of 608 Gram Panchayats in Maharashtra announced)
सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) दि. 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं की, कमी पाऊस असलेल्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body election Maharashtra) जाहीर करा.
कोर्टाच्या या आदेशानुसार, सध्या कमी पाऊस असलेल्या राज्यातील 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तसेच निवडणूक काळात या भागात जर अतिवृष्टी किंवा पूरस्थिती झाली तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्त मदान यांनी दिली.
१८ सप्टेंबरला ६०८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका…🚩🙏✌🤟
थेट सरपंचपदाची निवड होणार 🤟✌🚩🙏#GramPanchayat #Elections #Sarpanch
— ketan jagtap. (@k_e_t_a_n_9_6_) August 12, 2022
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम असा असेल
दि. 18 ऑगस्ट 2022 – निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होईल
दि. 24 ऑगस्ट ते दि. 01 सप्टेंबर 2022 – नामनिर्देशपत्रे दाखल करता येतील
दि. 27, 28, 31 ऑगस्ट 2022 – शासकीय सुट्ट्या असल्यानं अर्ज दाखल करता येणार नाहीत
दि. 02 सप्टेंबर 2022 – अर्जांची छाननी होईल
दि. 06 सप्टेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) – अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
दि. 18 सप्टेंबर 2022 – मतदान होईल (स. 7.30 ते सायं. 5.30)
दि. 19 सप्टेंबर 2022 – मतमोजणी होईल
कोणत्या जिल्ह्यात होणार निवडणुका (Elections will be held in this district)
नंदुरबार : शहादा (Shahada) 74 व नंदुरबार (Nandurbar) – 75.
धुळे (Dhule) : शिरपूर (Shirpur) – 33.
जळगाव (Jalgaon) : चोपडा (Chopada)- 11 व यावल (Yaval)- 02.
बुलढाणा (Buldhana) : जळगाव (जामोद) (Jalgaon (Jamod)) – 01, संग्रामपूर (Sangrampur) – 01, नांदुरा (Nandurbar) – 01, चिखली (Chikhli)- 03 व लोणार (Lonar)- 02.
अकोला (Akola) : अकोट (Akot)- 07 व बाळापूर (Balapur)- 01.
वाशीम (Washim) : कारंजा (Karnja)- 04.
अमरावती (Amravati) : धारणी (Dharani)- 01, तिवसा (Tivasa)- 04, अमरावती (Amravati)- 01 व चांदुर रेल्वे (Chandur Railway)- 01.
यवतमाळ (Yavatmal) : बाभुळगाव (Babhulgaon)- 02, कळंब (Kalamb)- 02, यवतमाळ (Yavatmal)- 03, महागाव (Mahagaon)- 01, आर्णी (Aarni)- 04, घाटंजी (Ghatanji)- 06, केळापूर (Kelapur) – 25, राळेगाव (Ralegaon)- 11, मोरगाव (Morgaon)- 11 व झरी जामणी (Jhari Jamani)- 08.
नांदेड (Nanded) : माहूर (Mahur)- 24, किनवट (Kinvat)- 47, अर्धापूर (Ardhapur)- 01, मुदखेड (Mudkhed)- 03, नायगाव (खैरगाव) (Naygaon (Khairgaon)- 04, लोहा (Loha)- 05, कंधार (Kandhar)- 04, मुखेड (Mukhed)- 05, व देगलूर (Deglur)- 01.
हिंगोली (Hingoli) : (औंढा नागनाथ (Aundha Nagnath) – 06.
परभणी (Parbhani) : जिंतूर (Jintur)- 01 व पालम (Palam)- 04.
नाशिक (Nashik) : कळवण (Kalvan)- 22, दिंडोरी (Dindori)- 50 व नाशिक- 17.
पुणे : जुन्नर (Junnar)- 38, आंबेगाव (Ambegaon)- 18, खेड (Khed)- 05 व भोर (Bhor)- 02.
अहमदनगर (Ahmadnagar): अकोले (Akole)- 45. लातूर (Latur): अहमदपूर (Ahamadpur)- 01.
सातारा (Satara): वाई (Vai)- 01 व सातारा (Satara)- 08.
कोल्हापूर (Kolhapur): कागल (Kagal)- 01.
एकूण : 608