
नाशिक l Nashik :
एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Employees Strike) आता अधिक चिघडण्याची शक्यता आहे. कर्मचारी आपल्या संपावर ठाम असल्याने प्रशासनाने आता विभागातील निलंबित कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यादृष्टीने प्रशानसाने आढावा घेतला असून येत्या दाेन ते तीन दिवसांत संपात सहभागी सर्व निलंबित कर्मचारी बडतर्फ (ST Employees Suspended) केले जाणार आहे.
मात्र दुसरीकडे शासकीय विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठामच असून कितीही कारवाई झाली तरी आता माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
https://ekhabarbat.com/1012-trains-canceled-across-the-country-find-out-the-train-full-schedule-here/
गेल्या ८७ दिवसांपासून संप सुरु आहे. पगारवाढ देवूनही कर्मचारी कामावर हजर हाेत नसल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत विभागात २०६ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहे.
तुंटपुजे वेतन तेही अनियमित मिळत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना माेठ्या अर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. याचमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी २७ ऑक्टोबर पासून आंदोलन सुरु असून अद्यापही यशस्वी ताेडगा निघालेला नाही.
परिणामी आधीच ताेटयात असलेल्या एसटी महामंडळाला काेटयवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. संपाच्या तिढा सुटत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी, विद्यार्थी व कामगार वर्गालाही फटका बसत आहे. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत ठाेस निर्णय घेवून बससेवा सुरळीत करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
दुसरीकडे खासगी वाहतूकदारांकडून अव्वाच्या सव्वा भाडे; प्रवाशांचे अतोनात हाल
एसटी संपाचा फायदा घेत खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून मनमानी भाडे दर आकारले जात असल्याने प्रवाशांना माेठा अर्थिक फटका बसत आहे.
धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून पिडीतेचा १० वर्षे लैंगिक छळ, तीनवेळा गर्भपात