खळबळजनक! जळगाव जिल्ह्यात तब्बल पशुवैद्यकीय ३२ डाॅक्टर बाेगस; क्षमता नसताना शस्त्रक्रिया करून मुक्या प्राण्यांच्या जीवांशी खेळ

खळबळजनक! जिल्ह्यात तब्बल पशुवैद्यकीय ३२ डाॅक्टर बाेगस; क्षमता नसताना शस्त्रक्रिया करून मुक्या प्राण्यांच्या जीवांशी खेळ! l 32 Bogus veterinary Doctors in the Jalgaon district
खळबळजनक! जिल्ह्यात तब्बल पशुवैद्यकीय ३२ डाॅक्टर बाेगस; क्षमता नसताना शस्त्रक्रिया करून मुक्या प्राण्यांच्या जीवांशी खेळ! l 32 Bogus veterinary Doctors in the Jalgaon district
Share on Social Sites

जळगाव l Jalgaon :

जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) असंख्य बाेगस व्हेटरनरी डाॅक्टर्स (Bogus Veterinary Doctor) कार्यरत असून ते पात्रता व क्षमता नसताना शस्त्रक्रिया करून प्राण्यांच्या जीवांशी खेळून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे.

अशा तब्बल ३२ डाॅक्टरांची नावे माेबइल नंबरसह देवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशिर कारवाई करावी, अशी तक्रार जिल्हा दूध संघात कार्यरत डाॅ. पंकज राजपूत (Dr. Pankaj Rajput) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या तक्रारीने संपूर्ण जिल्हात खळबळ माजली आहे.

यात विशेष बाब म्हणजे या तक्रारीला जवळपास पंधरा दिवस झाले असले तरी जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागा (Veterinary Department of Zilla Parishad) तर्फे कारवाई करण्यात आलेली नाही. बोगस पशुवैद्यकीय प्रक्टीस करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली असून ती महाराष्ट्र स्टेट व्हेटरनरी कौन्सिल, नागपूर (Maharashtra State Veterinary Council, Nagpur) कार्यालयाकडे पाठवली आहे.

काही शस्त्रक्रिया करणारे बोगस डॉक्टर हे अनाधिकृतपणे केटामाइन (Ketamine), झायलेक्झीन (Xylexine), लिग्नोकेन (Lignocaine), सिक्वील (Sequil) व प्रोफोफॉल (Profofol) असे प्राण्यांना बेशुध्द करण्यासाठी लागणारे शेडयुल एचचे ड्रग (Scheduled H drugs) स्वत: जवळ बाळगून नाकोटीक ड्रग्ज अॅक्ट (Narcotic Drugs Act) प्रमाणे गंभिर स्वरुपाचे गुन्हे करत आहे.

महिलांच्या ‘न्यूड डान्स’ प्रकरणी मोठी कारवाई, १० आयोजक आणि ३ डान्सर्सना अटक

यांच्या विरुद्ध आहे तक्रार

चाळीसगाव तालुका (Chalisgaon Taluka) : प्रविण पाटील, जितेंद्र पाटील, सोमाग चरेकर विरेंद्र शिंदे दीपक शेवाळे.

पाचोरा तालुका (Pachora Taluka) : सुधाकर शेळके.

पारोळा तालुका (Parola Taluka) : बाळू राठोड, प्रसाद जडे, बत्तू पाटील.

भडगाव तालुका (Bhadgaon Taluka) : गोकुळ पाटील, कुणाल पाटील, नीलेश राठोड, श्रीकांत पाटील, नितीन पाटील, भूषण पाटील.

चोपडा तालुका (Chopda Taluka) : रामचंद्र छगन सोनवणे, लखीचंद रुपचंद महाजन, रवींद्र कोळी, मुकलाल कोळी.

एरंडोल तालुका (Erandol Taluka) : अभय देसले, सागर पाटील.

बोदवड तालुका (Bodwad Taluka) : शुभम माळी, गजानन कन्हेरकर.

भुसावळ तालका (Bhusawal Taluka) : अशीर शेख, सुधाकर वानखेडे, शेख साजीद, शेख समीर.

जामनेर तालुका (Jamner Taluka) : प्रफुल्ल डांगे.

दाेघांवर गंभीर आराेप

पाराेळा तालुक्यातील बाळू राठाेड यांच्यावर माणसांवर उपचार करीत असल्याचा आराेप डाॅ. राजपूत यांनी केला आहे. तर प्रसाद जडे यांचा पशुवैद्यकीय काेर्स झालेला नसताना ते अनाधिकृत प्रॅक्टीस करीत असल्याचे म्हटले आहे.

एक वर्षापूर्वी एलडीओ डाॅ. देशमुख व डाॅ. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात शस्त्रक्रिया करत हाेताे. आता करत नाही. तसेच माणसांवर उपचार करीत असल्याचा आराेप चुकीचा आहे.

: बाळू सुदाम राठाेड, तक्रारींमध्ये नाव असलेले

See also  ...तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय; फडणवीसांनाही होती कल्पना?

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites