
मुंबई l Mumbai (ई खबरबात न्यूज नेटवर्क) :
विधान परिषदेच्या काल (दि. 20) लागलेल्या निकालानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला असून अवघ्या 12 तासांमध्ये राज्यच राजकारण पूर्णतः बदललं आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena leader Eknath Shinde) यांच्यासोबत साधारण 35 आमदार नॉटरिचेबल (35 MLAs are Notreachable) आहेत.
…तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार; CM उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
त्यामुळे लवकरच राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेमक्या भावना काय आहेत याबद्दल भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी शिंदे यांनी शिवसेनेला तीन पर्याय दिले आहेत.
एकनाथ शिंदे गटाचं अखेर ‘हे’ नाव ठरलं! थेट सेनेच्या अस्तित्वाला आव्हान
काय आहेत अटी?
एकनाथ शिंदे कोणत्याही पक्षासोबत जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीसोबत (Nationalist Congress Party NCP) जायचं नाही, अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर शिवसैनिकांवर (Shiv Sainik) अन्याय होता कामा नये, तसंच शिवसेना आमदारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत. शिंदे चर्चा करायला तयार आहेत. पण, सर्व आमदारांसोबत चर्चा केली जावी अशी त्यांची मागणी आहे. तसेच शिंदे यांनी शिवसेनेला राज्यात भाजप (BJP) सोबत सत्ता, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (Devendra Fadnavis as Chief Minister) आणि स्वतः उपमुख्यमंत्री बनवण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. दानवे यांच्या या विधानामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात दिल्लीत देखील भाजपच्या उच्च पदस्थ नेत्यांच्या बैठकींना वेग आला असून, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहे.
https://twitter.com/ANI/status/1539134094415650817
बंडाची ठिणगी का?
एकनाथ शिंदे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते (Eknath Shinde legislature group leader) आहेत. सर्व आमदारांचे प्रमुख असूनही त्यांनी प्रमख निर्णय प्रक्रियेतून नेहमी दूर ठेवलं जातं. हे कुणाच्या सांगण्यावरून केलं जात होतं. याचीही माहिती एकनाथ शिंदे यांना होती. तरीही कधी ना कधी न्याय मिळेल या आशेने ते पक्षात कार्यरत राहिले. मात्र राज्यसभा (Rajya Sabha) आणि विधान परीषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election) सर्व सूत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांच्याकडे दिली आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांमध्ये बंडाची ठिणगी पेटली.
https://twitter.com/IndiaAnalytics/status/1539155954897330176