धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून पिडीतेचा १० वर्षे लैंगिक छळ, तीनवेळा गर्भपात

लग्नाचे आमिष दाखवून पिडीतेचा १० वर्षे लैंगिक छळ; तीनवेळा गर्भपात l Sexual harassment of a woman for ten years by showing the lure of marriage
लग्नाचे आमिष दाखवून पिडीतेचा १० वर्षे लैंगिक छळ; तीनवेळा गर्भपात l Sexual harassment of a woman for ten years by showing the lure of marriage
Share on Social Sites

नाशिक l Nashik :

महिलेला विवाहाचे आमिष दाखवून वारंवार शरीर संबंध प्रस्थापित करणे आणि तिच्या न कळत मद्य पाजून काढलेली आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन छळ केल्याप्रकरणी युवकावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीसांनी संबंधितास बेड्या ठोकल्या आहेत.

दरम्यान, सदर युवकाने पिडीतेचा तीनदा जबरदस्तीने गर्भपात केल्याचेही उघड झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, गणेश राजाराम भोसले (३४, रा. महालक्ष्मी बंगला, खोडेनगर) असे संशयिताचे नाव आहे. पिडीतेच्या तक्रारीनुसार, संशयिताने विवाहाचे आमिष दाखवून शहर आणि नजिकच्या परिसरांत नेऊन शरीरसंबध प्रस्थापित केले.

ड्राई फ्रूट व्यावसायिकाला ९ लाखांचा Online गंडा

तिच्या नकळत तिला मद्य पाजून आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्रे काढून ते नातेवाईक तसेच समाज माध्यमांवर प्रसृत करण्याची धमकी दिली. संशयिताने अनेकदा अश्‍लिल व्हॉट्सअ‍ॅप चॅट करून अनैसर्गिक कृत्य केल्याचाही पिडीतेचा आरोप आहे. या काळात पिडीतेचा तीन वेळा गर्भपात करण्यात आला. त्याला विरोध केला असता तिच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी संशयिताने दिली.

या मानसिक छळाला कंटाळून पिडीतेने संशयिताविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर संशयित गणेश राजाराम भोसले यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

See also  संजय राऊतांचा विरोधकांवर घणाघात; मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे 'नामर्द'

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  ‘या’ शिवसेना आमदाराचे दुबईत निधन.. सहकुटुंब गेले होते शॉपिंगला

Share on Social Sites