
कीव l Kiev :
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आज (दि. २५) दुसरा दिवस आहे. (Russia Ukraine war) शुक्रवारी सकाळी युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zhelensky) यांनी जाहीर केले की संपूर्ण सैन्य युद्धात खेचले जाईल.
Video : बापरे! यूक्रेनच्या सायकलस्वारावर पडला रशियाच्या तोफेचा गोळा, पुढे काय झालं व्हिडिओ पाहा
युक्रेनने दावा केला आहे की, त्यांच्या सैन्याने ८०० हून अधिक रशियन सैनिकांना ठार केले आहे. तर ३० रशियन रणगाडे आणि ७ गुप्तचर विमानेही नष्ट करण्यात आली आहे.
https://twitter.com/KyivIndependent/status/1497077886037151761
दरम्यान, युक्रेन सरकारने १८ ते ६० वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. युक्रेनने आपल्या १०,००० नागरिकांना लढाईसाठी रायफल दिल्या आहेत. शुक्रवारी सकाळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की (Ukrainian President Zhelensky) यांनीही एक निवेदन जारी केले.
ते म्हणाले की, जगाने आपल्याला युद्धात लढण्यासाठी एकटे सोडले आहे. त्यांनी सांगितले की, ते कीवमध्ये आहेत आणि रशियन सैन्य तेथे दाखल झाले आहे. या रशियनांचे पहिले टार्गेट एकच असून दुसरे टार्गेट त्यांचे कुटुंब असल्याचेही त्यांनी सांगितले.
https://twitter.com/ANI/status/1497057226196135939
दोन्ही देशातील युद्धात रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनमधील १३७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३१६ जण जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या अहवालानुसार, रशियाने युक्रेनवर एकूण २०३ हल्ले केले, ज्यामध्ये १६० हल्ले क्षेपणास्त्रे आणि ८३ जमिनीवर आधारित लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला.
युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनी दावा केला आहे की, ७ रशियन विमाने, ६ हेलिकॉप्टर, ३० टाक्या युक्रेनच्या सैन्याने नष्ट केल्या आहेत.रशियन सैन्याने युक्रेनच्या कोनोटोप शहराला वेढा घातला आहे, बाकीचे सैन्य राजधानी कीवच्या दिशेने जात आहे.
https://twitter.com/nytimes/status/1497066350715490317