
नवी दिल्ली l New Delhi :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे वृत्त समोर आले आहे. गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल इंव्हेस्टिगेशन एजंसीला (National Investigation Agency (NIA) यासंदर्भात ई-मेल मिळाला आहे.
एवढेच नाही, तर या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत आहोत, असेही ई-मेल करणाऱ्याने म्हटले आहे. (Conspiracy To Assassinate PM Modi)
https://twitter.com/NewsArenaIndia/status/1509807128688558081
पंतप्रधान मोदी यांना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार आहे. त्यांच्याकडे एकूण 20 किलो आरडीएक्स (RDX) आहे. स्लीपर सेलकडून 20 किलो आरडीएक्सच्या सहाय्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचला जात होता. (Terrorist planning to assassinate PM Narendra Modi)
पंतप्रधान मोदींच्या हत्येच्या कटासंदर्भातील ई-मेलचा स्रोत काय? याची माहिती संरक्षण संस्था मिळवत आहे. तसेच, या नापाक इराद्याने दहशतवादी संघटनांनी 20 स्लीपर सेल तयार केल्याचेही, संस्थांचे म्हणणे आहे.
एप्रिल फूल नव्हे, एप्रिल फायर!; ग्राहकांना झटका, सिलिंडरच्या दरात मोठी वाढ