
दिल्ली l Delhi :
बीआर चोप्रा यांच्या महाभारत (BR Chopra’s Mahabharat) या मालिकेत ‘भिम’ (Bhima) ही भूमिका साकारणारे अभिनेता प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti) यांचे निधन झाले आहे.
दिल्लीमधील (Delhi) अशोक विहार येथील राहत्या घरी प्रवीण कुमार सोबती यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षाचे होते. गेले अनेक दिवस ते आजारी होते. त्यांना पाठी दुखीची समस्या जणवत होती. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यांची कन्या निपुणिकाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना काल (दि. ०७) सोमवारी रात्री ९.३० वाजता ह्रदयविकाराचा झटका आला होता.
पंजाबमधील तरणतारण (Tarantaran, Punjab) हे प्रवीण कुमार सोबती यांचे मूळ गाव होते. त्यांच्या महाभारत या मालिकेतील ‘भिम’ या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यांच्या फिटनेसमुळे ते नेहमी चर्चेत असत. फिटनेसमुळे त्यांना चित्रपट आणि मालिकांमधील बॉडीगार्ड किंवा गुंडाच्या भूमिकेच्या ऑफर्स येत होत्या. फिटनेसमुळेच त्यांना भिम ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.
प्रवीण कुमार सोबती यांनी ३० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याआधी ते हॅमर आणि डिस्कस थ्रो एथलीट (Discus Throw Athlete) होते. एशिशन गेम्समध्ये (Asian Games) त्यांनी दोन गोल्ड मेडल पटकावले होते. तसेच त्यांनी दोन सिल्व्हर आणि एक ब्रॉन्झ मेडल देखील त्यंनी पटकावले होते. त्यांनी १९६८ मधील मॅक्सिको ऑलिम्पिक्स (Mexico Olympics) आणि १९७२ मधील म्यूनिख ऑलिम्पिक्समध्ये (Munich Olympics) भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच ते बीएसएफचे (BSF) जवान देखील होते.
यूक्रेनवर ७२ तासांत रशियाचा कब्जा, १९ हजार जवानांसह ५० हजार लोकांचा मृत्यू?