
नाशिक l Nashik :
नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील हॉटेल सोनाली गार्डन (Hotel Sonali Garden on Nashik-Trimbakeshwar Road) येथे दहा वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरून एकाची लोखंडी गजाने हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी पाच जणांना अटक करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी आज शनिवारी (दि. २९) नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात (Nashik District and Sessions Court) झालेल्या सुनावणीत यातील पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
खून झाल्यानंतर सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे (Police Inspector K. R. Popere) यांनी मुख्य आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करत अभ्यासपूर्ण तपास करत दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायलयात सुरु होती. आज (शनिवारी) मुख्य न्यायाधीश ए. एस. वाघवसे (Chief Justice A. S. Waghavase) यांनी फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपींना शिक्षा ठोठावली.
जिल्ह्यात गँगवारचा भडका; तुफान राड्यात एकाचा खून, एक जण गंभीर