सावधान! उत्तर महाराष्ट्रासह ‘या’ ११ जिल्ह्यांत पावसाची शक्यता

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहे. पुढील चोवीस तासांत अरबी समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे l Rain Possibilities in Maharashtra
राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहे. पुढील चोवीस तासांत अरबी समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे l Rain Possibilities in Maharashtra
Share on Social Sites

पुणे l Pune :

ऐन हिवाळ्यात गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान काही ठिकाणी झालेल्या गारपिटीने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

असे असताना राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहे. यासोबतच पुढील चोवीस तासांत अरबी समुद्रात (Arabian Sea) वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यासोबतच कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याने आज मुंबईसह (Mumbai) पुणे (Pune), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), नाशिक (Nashik), अहमदनगर (Ahmednagar), जळगाव (Jalgaon), धुळे (Dhule)आणि नंदुरबार (Nandurbar) या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज सकाळपासून याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.

त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यासोबतच दक्षिण गुजरात (South Gujarat) आणि लगतच्या मध्य प्रदेशात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही भागांत पावसाला सुरुवात देखील झाली आहे.

See also  खळबळजनक! जिल्ह्यात तब्बल २० शाळा बोगस

थंडीचा कडाकाही वाढणार

उद्या महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. उद्या रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या दोन जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. २३ जानेवारीनंतर राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढणार आहे. दरम्यान, किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे.

See also  सैराटची पुनरावृत्ती, आधी मुलीच्या वडिलांनी धमकावलं, योगेशला अज्ञातांनी भोसकलं

Share on Social Sites