संतूरचे सूर मुके झाले… पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा कालवश

संतूरचे सूर मुके झाले... पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा कालवश l Santoor maestro Pandit Shivkumar Sharma passes away
संतूरचे सूर मुके झाले... पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा कालवश l Santoor maestro Pandit Shivkumar Sharma passes away
Share on Social Sites

प्रख्यात संतूर वादक आणि संगीतकार पं. शिवकुमार शर्मा यांचं निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीच्या समस्येने (Kidney Problem) त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. (Santoor maestro Pandit Shivkumar Sharma passes away)

वयाच्या 13व्या वर्षांपासून पंडितजींनी संतूर शिकण्यास प्रारंभ केला. आज संतूर या वाद्याला देशविदेशात लोकप्रियता मिळवून देण्याचे सारे श्रेय त्यांना जाते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी मनोरमा शर्मा (Manorama Sharma) आणि पुत्र राहुल शर्मा (Rahul Sharma) असा परिवार आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1523927993848107010

1967 मध्ये त्यांनी हरिप्रसाद चौरसिया (Hariprasad Chaurasia) आणि संगीतकार ब्रजभूषण काबरा (Composer Brajbhushan Kabra) यांच्यासोबत केलेला ‘कॉल ऑफ द व्हॅली’ (Call of the Valley) नावाचा अल्बम भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वात मोठा हिट ठरला.

https://twitter.com/abhirucha/status/1523918146490421248

1955 मध्ये, त्यांनी बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे पहिला सार्वजनिक कार्यक्रम दिला. वर्षभरानंतर त्यांनी ‘झनक झनक पायल बाजे’ (Jhanak Jhanak Payal Baaje) चित्रपटातील एका दृश्यासाठी पार्श्वसंगीत दिले. त्यांचा पहिला एकल अल्बम 1960 मध्ये रेकॉर्ड झाला.

2002 मध्ये त्यांनी ‘जर्नी विथ अ हंड्रेड स्ट्रिंग्स: माय लाइफ इन म्युझिक’ (Journey with a Hundred Strings: My Life in Music) हे आत्मचरित्र प्रकाशित केले. ते भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि जपान (Japan), जर्मनी (Germany), ऑस्ट्रेलियातून (Australia) आलेल्या विद्यार्थ्यांना फी न आकारता गुरूंच्या परंपरेनुसार संतूर संगीत शिकवतात. आणि अमेरिकेसारख्या जगाच्या विविध भागातून त्यांच्याकडे येतात.

https://twitter.com/Vijay99611168/status/1523929812946939905

See also  मशिदींच्या भोंग्यांना 3 मे पर्यंत अल्टीमेटम, ऐकले नाही तर… राज ठाकरेंचा थेट इशारा
See also  'अब की बार, शिंदे सरकार'; 'इतक्या' मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, आता राज्यात ‘शिंदेशाही’ सुरू

Share on Social Sites