
मशिदींच्या भोंग्यांना 3 मे पर्यंत अल्टीमेटम, ऐकले नाही तर… राज ठाकरेंचा थेट इशारा
मुंबई l Mumbai :
राज्यावर एक भयानक वीज संकट (Maharashtra Power Crisis) कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यातील कोळसाचा साठा (Coal Storage in Maharashtra) फार कमी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
विशेष म्हणजे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी याबाबत माहिती दिली होती. केंद्र सरकारने (Central Government) कोळसा उपलब्ध करुन दिला नाही तर राज्यावर मोठं वीज संकट कोसळेल, अशी सूचक माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी एका वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेली बातमी शेअर करत लोड शेडिंगच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर (Mahavikas Aghadi Government) निशाणा साधला आहे.
https://twitter.com/bnanday/status/1513762921217617922
विशेष म्हणजे, प्रकाशित केलेल्या त्या बातमीत राज्यात दरदिवसा दिवसा किंवा रात्री तब्बल आठ तास लोडशेडिंग राहील. (Load shedding in Maharashtra) याचाच अर्थ दिवसभर तब्बल आठ तास लाईट नसेल. त्यामुळे चिंता वाढली आहे. या सगळ्या घडामोडी पाहता आता आपली वाटचाल नेमकी कोणत्या दिशेला सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भर उन्हाळ्यात अशाप्रकारचं वीजसंकट कोसळल्यास सर्वसामान्यांच्या अंगाची अधिक लाहीलाही होण्याची दाट शक्यता आहे. राज्य आणि केंद्र सरकार यावर नेमकं काय तोडगा काढतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
“सावध! ऐका पुढल्या हाका. टँकरमुक्तीतून पुन्हा टँकरयुक्त, भारनियमनमुक्तीतून पुन्हा भारनियमनाकडे, राज्यात केवळ आणि केवळ भ्रष्टाचार, ‘नो गव्हर्नन्स’मुळे जनता हैराण, परिणाम दिसू लागले आहेत. अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1513810380526866435
ऊर्जामंत्री राऊतांची नेमकी भूमिका काय?
दरम्यान, राज्यात फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. त्याचबरोबर तीन दिवस पुरेल इतकं पाणी शिल्लक आहे. केंद्र सरकारने (Central Government) राज्यासाठी कोळसा उपलब्ध करुन दिला नाही तर मोठं वीजसंकट कोसळू शकतं, अशी माहिती स्वत: ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी काल दिली होती. यावर आज पुन्हा नितीन राऊत यांनी यासंदर्भातली आज पुन्हा माहिती दिली.
“कोळसा टंचाईचं संकट मोठ्या प्रमाणात आहे. त्यावर उष्णता वाढली आहे, वीज मागणी वाढली आहे. सण उत्सव सुरू आहेत. काल मी तिन्ही कंपन्यांची बैठक घेतली. कोरोना संपला त्यामुळं सर्व उद्योग मोठ्या जोमानं सुरू आहेत. अलीकडे कोळसा उपलब्ध होत नाही आहे. उपलब्ध झाला तर रेल्वे रॅक (Railway rack) मिळत नाही, आमचे प्रतिनिधी केंद्र सरकारकडे गेले आहेत”, अशी माहिती नितीन राऊतांनी दिली आहे.
SBI युजर्स सावधान, एका क्लिक आणि बँक खाते होईल रिकामे; Yono SMS द्वारे होतोय नवीन Scam