
पिंपरी l Pimpri :
नुकताच प्रदर्शित झालेला बहुचर्चित ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट दिवसेंदिवस वादाचा विषय ठरत आहे. चित्रपटाच्या पटकथेवरून सोशल मीडियात राजकीय वाद (The Kashmir Files Controversial movie) टोकाला गेला आहे. अनेकांनी या चित्रपटावरून वादावादी देखील केली आहे.
अशात पुण्यातील पिंपरी (Pune) परिसरातील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. संबंधित तरुण ‘द काश्मीर फाइल्स’ पाहून आल्यानंतर त्याला ‘ब्रेन स्ट्रोक’ (Brain Stroke) अर्थातच मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी फूटून त्याचा मृत्यू (Death) झाला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
अभिजित शशिकांत शिंदे (Abhijit Shashikant Shinde) असे मृत पावलेल्या 38 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchvad) परिसरातली लिंकरोड येथील रहिवासी आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याला ‘ब्रेन स्ट्रोक’ होऊन त्याचा मृत्यू झाला आहे.
सावधान! ‘The Kashmir Files’ बद्दल तुम्हाला लिंक आलीय का? पोलिसांनी दिली ‘हि’ माहिती