‘असा’ झाला डॉ. सुवर्णा वाजे यांचा खुनाचा उलगडा; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

'असा' झाला डॉ. सुवर्णा वाजे यांचा खुनाचा उलगडा; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात l NMC dr suvarna waje murder case solved nashik nasik
'असा' झाला डॉ. सुवर्णा वाजे यांचा खुनाचा उलगडा; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात l NMC dr suvarna waje murder case solved nashik nasik
Share on Social Sites

नाशिक l Nashik :

अखेर शहरातील बहुचर्चित खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांना डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मारेकरीला शोधण्यास यश आहे.

डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणात त्यांचे पती संदीप वाजे हेच असून नाशिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. वाजे यांच्या हत्येत त्यांच्या पतीचा समावेश असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

गेल्या (दि. २६ जानेवारी) वाडीवऱ्हे परिसरात पोलिसांना जळालेल्या अवस्थेत गाडीसह मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचा असल्याची प्राथमिक माहिती होती.

..अखेर डॉ. सुवर्णा वाजे यांची ‘मर्डर मिस्ट्री’ सॉल्व; पतीनेच थंड डोक्याने काटा काढला : ‘असा’ होता संपूर्ण घटनाक्रम

तत्पूर्वी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या पतीने वाजे यांच्यासंदर्भात मिसिंग तक्रार देखील दाखल केली. होती. यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. मात्र जळालेल्या अवस्थेत आढळली गाडी आणि मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचाच आहे का, हे तपासण्यासाठी DNA चाचणी करण्यात आली होती. त्यात वाजे कुटुंबीय आणि गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत हे प्रकरण सुवर्णा वाजे यांच्या पतीभोवती फिरत असल्याचे तपासात दिसून आले. त्यामुळे वेळोवेळी पोलिसांनी वाजे यांना जबाबासाठी देखील बोलावले होते. त्यानंतर आता डीएनए एकच असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सुवर्णा वाजे यांच्या पतीस चौकशीसाठी बोलवले.

See also  INS Vikrant : जय भवानी, जय शिवाजी! नौदलाच्या नवीन ध्वजावर छत्रपती शिवरायांची मोहोर! काय आहे कनेक्शन?

यावेळी पोलिसाना गुंगारा देत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी अधिक माहिती घेतली असता वाजे यांच्या हत्येमागे त्यांच्याच पतीचा हात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संशयित संदीप वाजे याला पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले असून पुढील तपास नाशिक पोलीस करीत आहे.

https://thenashikherald.com/dr-suvarna-waze-murder-nashik-nasik/

See also  ...तर निवडणूक घेण्यास काय हरकत? सुप्रीम कोर्टाकडून राज्य निवडणूक आयोगाला निर्देश

Share on Social Sites