द्रौपदी मुर्मू नव्या राष्ट्रपती! देशाच्या सर्वोच्चपदी पहिल्यांदाच आदिवासी महिला विराजमान

President Draupadi Murmu become the President of India
Share on Social Sites

नवी दिल्ली l New Delhi :

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (National Democratic Alliance NDA) द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) या देशाच्या नव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा (UPA candidate Yashwant Sinha) यांचा पराभव केला आहे. आज राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. त्यामध्ये द्रौपदी मुर्मू या मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्या देशाच्या 15व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. (NDA Presidential candidate Droupadi Murmu crosses the 50% mark of total valid votes at the end of the third round of counting; set to become the President of the country)

राष्ट्रपतिपदासाठी दि. 18 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी झाली. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात लढत होती. द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत 719 खासदारांसह देशभरातील 4 हजारांहून अधिक आमदारांनी मतदान केले होते. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) हे येत्या दि. 24 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत.

See also  जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, तब्बल 528 मतं मिळाली; मार्गारेट अल्वांना 182 मतं

मुर्मू यांच्या विजयानंतर भाजप (BJP) देशभर जल्लोष साजरा करण्यात येत आहे. दिल्लीत विजय रॅली काढली जाणार आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार विजयी झाल्यानंतर रॅली काढण्याची ही पहिलीच वेळ असेल. दिल्लीतील रॅलीचं नेतृत्व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (BJP National President JP Nadda) करणार असून यावेळी ते भाषणही करणार आहेत. यावेळी तब्बल 20 हजार लाडूंचं वाटप केलं जाणार आहेत.

नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूकोण आहेत? (Who is New President Draupadi Murmu?)

द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या (Jharkhand) माजी राज्यपाल आहेत. मुर्मू या ओदिशा (Odisha) राज्यातील आहेत. द्रौपदी मुर्मू या स्वतंत्र भारतातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. (Draupadi Murmu became the first tribal woman President of independent India) तर, दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. यूपीएच्या काळात काँग्रेसनं प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil) यांना राष्ट्रपतीपदाव संधी दिली होती.

द्रौपदी मुर्मू या ओदिशा राज्यातील आहेत. झारखंड (Jharkhand) राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. झारखंडच्या राज्यपाल म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म दि. 20 जून 1958 मध्ये झाला. मुर्मू या ओदिशा जिल्ह्यातील मयुरभंज जिल्ह्यातील (Mayurbhanj District) आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्त्व करतात. सरकारी कार्यालयात त्या लेखनिक मधून कार्यरत होत्या. मुर्मू यांनी मोफत अध्यापनाचं काम केलं त्यानंतर त्या राजकारणात आल्या. भाजपच्या आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू 2000 आणि 2009 मध्ये विजयी झाल्या. भाजपमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी 2013 ते 2015 मध्ये काम केलं आहे.

द्रौपदी मुर्मू यांनी नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द सुरु केली. रायरंगपूरच्या (Rairangpur) उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. भाजपमध्ये द्रौपदी मुर्मू यांनी विविध पदांवर काम केलं आहे.

गणपती बाप्पा…! यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात, निर्बंधातून मुक्तता

See also  धक्कादायक! महिलेनेच आखला प्लॅन; अल्पवयीन मुलीवर ८ जणांकडून बलात्कार

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  'जय महाराष्ट्र' म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अखेर राजीनामा

Share on Social Sites