
मुंबई । Mumbai :
कोची येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते आज (दि. 02) भारताची पहिली स्वदेशी युद्धनौका INS विक्रांत भारतीय नौदलात सामील करण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण केले. त्यावेळी त्यांनी हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) समर्पित केला आहे. नवीन ध्वजाचं छत्रपती शिवाजी महाराजांशी एक खास कनेक्शन आहे. स्वराज्याच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेत नव्या चिन्हाच अनावरण करण्यात आलं आहे. (Indian navy got a new ensign the design is taken from the seal of Chhatrapati Shivaji Maharaj)
केरल: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कोचीन में देश के पहले स्वदेशी युद्धपोत INS विक्रांत को भारतीय नौसेना को समर्पित किया। यह भारत के समुद्री इतिहास में अब तक का सबसे बड़ा और सबसे जटिल युद्धपोत है। pic.twitter.com/LjBWfTGoiK
— RapidLeaks (@RapidLeaksIndia) September 2, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोचीमध्ये नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण केलं. हे करत असताना त्यांनी हा नवा ध्वज नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे. सध्याच्या ध्वजामध्ये सेंट जॉर्जचा क्रॉस (St. George Cross) लावण्यात आला होता. तसंच एका कोपऱ्यामध्ये तिरंगाही लावण्यात आला होता. मात्र जुन्या ध्वजामध्ये तिरंग्याऐवजी युनियन जॅक (Union Jack) लावण्यात आला होता. विशेष म्हणजे, स्वराज्याच्या राजमुद्रेतून (Rajmudra) प्रेरणा घेत नव्या चिन्हाच अनावरण करण्यात आलं आहे.
आपल्याला शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) प्रचलित अष्टकोनी राजमुद्रा माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची (Hindavi Swarajya) स्थापना केल्यावर संस्कृतमध्ये (Sanskrit) राजमुद्रा तयार झाली. भारतात अनेक वर्षांनी प्रथमच संस्कृतभाषेत राजमुद्रा बनवली गेली.
“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।। शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।” असे त्या राजमुद्रेवर लिहण्यात आलं आहे.
आज अनावरण करण्यात आलेल्या नौदलाच्या ध्वजावर (Indian Navy flag) राजमुद्रेचा अष्टकोनी आकार पाहायला मिळत आहे. अशातच नरेंद्र मोदी यांनी त्यांनी हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं. शिवरायांनी नौदलाचा विकास केला. अशा शब्दात गौरवास्पद उद्गार काढले आहेत.
या नव्या ध्वजामधून मात्र ब्रिटीशांच्या सर्व खुणा हटवण्यात आल्या आहेत. आता या ध्वजावर संपूर्णपणे भारतीय छाप असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
विक्रांत विशाल-विराट- विहंगम
“विक्रांत विशाल आहे, विराट आहे, विहंगम आहे.. विक्रांत विशिष्ट आहे, विक्रांत खासही आहे. विक्रांत ही केवळ युद्धनौका नाही. 21 व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा हा पुरावा आहे”
"ज्याचं आरमार त्याचा समुद्र… आरमार हे एक स्वतंत्र राज्यांगच आहे…"
– छत्रपती शिवाजी महाराजस्वराज्याचा विस्तार होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली आरमार उभारले. pic.twitter.com/GK3zesVSQ7
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) September 2, 2022
नौदलाचा नवा ध्वज शिवरायांना समर्पित
छत्रपती शिवाजी महाराजांचं नौदलातील योगदान अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “सागरी शक्तीच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी असं नौदल उभारलं, ज्याने शत्रूंची झोप उडवली. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय जहाजांची ताकद आणि त्याद्वारे होणाऱ्या व्यापाराच्या ताकदीचा धाक होता. आतापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची ओळख होती. मात्र आता छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने आजपासून नौदलाचा नवा झेंडा समुद्रात आणि आकाशात फडकणार आहे. भारतीय नौदलाच्या झेंड्यावर आतापर्यंत गुलागिरीचं निशाण होतं. पण आज २ सप्टेंबर २०२२ या ऐतिहासिक तारखेला इतिहास बदलून टाकणारं काम आपण केलंय. आज भारताने गुलामगिरीचे ओझं झेंड्यावरुन पुसून टाकलंय. आजपासून भारतीय नौदलाला नवा झेंडा मिळाला आहे”.
The countdown has begun…
A momentous occasion for the Nation 🇮🇳 and #Indiannavy – Commissioning of #IACVikrant on 02 Sep 22.
Watch🎥a sneak peek into a Day's life onboard the 'Pride of our Nation'.#AatmaNirbharBharat @indiannavy @cslcochin pic.twitter.com/KdHLgfFeY2— IN (@IndiannavyMedia) September 1, 2022