Big News : मालेगावात राष्ट्रीय काँग्रेसला ‘दे धक्का’; २७ नगरसेवकांची एकाच वेळी सोडचिठ्ठी

Big News : मालेगावात राष्ट्रीय काँग्रेसला 'दे धक्का'; २७ नगरसेवकांची एकाच वेळी सोडचिठ्ठी l Political News Congress Malegaon
Big News : मालेगावात राष्ट्रीय काँग्रेसला 'दे धक्का'; २७ नगरसेवकांची एकाच वेळी सोडचिठ्ठी l Political News Congress Malegaon
Share on Social Sites

मालेगाव l Malegaon :

शहरात काँग्रेसचे (Congress) सर्वेसर्वा माजी आमदार रशीद शेख (MLA Rashid Shaikh) कुटुंबियांत गेले सहा महिने सुरु असलेले राजकीय नाट्याला आज पूर्ण विराम मिळाला आहे. त्यांनी पत्नी व महापौर ताहेरा शेख (Mayor Tahera Sheikh) यांच्यासह सत्तावीस नगरसेवकांनी आज मंगळवार (दि. २५ जानेवारी) काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party (NCP) प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

आज याबाबत काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले कि, मालेगाव शहराच्या विकासासाठी आम्हाला काम करायचे आहे. त्यासाठी विविध निधी व योजनांना मंजूरी हवी आहे. मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) वगळता अन्य कोणीही मंत्री आम्हाला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे आमची प्रचंड नाराजी होती.

https://twitter.com/Aadil_Ikram/status/1485943382635597828

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. उर्जा खाते काँग्रेस पक्षाकडे आहे. मात्र गेल्या दोन वर्षात मालेगाव (Malegaon City) शहरासाठी काहीही निर्णय झालेला नाही. हे फार काळ चालण्यासारखे नाही. त्यामुळेच आम्ही काँग्रेस पक्षात राहून काहीही उपयोग नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी महापौर ताहेरा शेख यांसह मालेगाव महापालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. त्या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. शेख यांची पुत्र व माजी आमदार आसीफ शेख (Former MLA Asif Sheikh) यांनी सहा महिन्यांपूर्वीच काँग्रेसचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

See also  हिरकणी गावाला 21 कोटीचा निधीसह मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानसभेत 'या' तीन मोठ्या घोषणा

त्यानंतर रशीद शेख यांनी उघडपणे राष्ट्रवादीच्या दिशेने पावले टाकीत राजकीय वाटचाल सुरु केली होती. आज त्याला मूर्त स्वरूप मिळाले. या निर्णयाने मालेगाव शहरात यापुढे दोन्ही काँग्रेसमध्ये स्पर्धा अधिक तीव्र होईल यात शंका नाही. या मोठ्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

मालेगाव महापालिकेत काँग्रेसचा सुफडा साफ, आमदारासह २८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पक्षाला घरघर सुरूच!

गेल्या काही वर्षांत नाशिक जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला घरघर लागलेली आहे. पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते इतर पक्षांची वाट धरून मोकळे झालेत. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या सत्तेत असूनही कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याची जिल्ह्यात व्यापक भावना आहे. मालेगाव मध्य मतदार संघ मुस्लीम बहुल असून, काँग्रेस पक्षाची हक्‍काची ‘वोट बँक’ म्हणून त्याकडे पाहिले जात असताना आजची घडामोड पक्षाला मोठा धक्‍का असल्याचे मानले जाते.

डॉ. तुषार शेवाळेंच्या भूमिकेकडे लक्ष

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे मालेगावचे आहेत. आपल्या बालेकिल्ल्यात पक्षाची पडझड होत असताना आता डॉ. शेवाळे काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Nitesh Rane: नितेश राणेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टानेही नाकारला जामीन : शरण येण्यासाठी इतक्या’ दिवसांची मुदत

See also  ...तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय; फडणवीसांनाही होती कल्पना?

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites