
नाशिक l Nashik :
महिलेला विवाहाचे आमिष दाखवून वारंवार शरीर संबंध प्रस्थापित करणे आणि तिच्या न कळत मद्य पाजून काढलेली आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन छळ केल्याप्रकरणी युवकावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीसांनी संबंधितास बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान, सदर युवकाने पिडीतेचा तीनदा जबरदस्तीने गर्भपात केल्याचेही उघड झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, गणेश राजाराम भोसले (३४, रा. महालक्ष्मी बंगला, खोडेनगर) असे संशयिताचे नाव आहे. पिडीतेच्या तक्रारीनुसार, संशयिताने विवाहाचे आमिष दाखवून शहर आणि नजिकच्या परिसरांत नेऊन शरीरसंबध प्रस्थापित केले.