Pune-Ahmadnagar highway accident : पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात; 5 जण जागीच ठार

Pune-Ahmadnagar highway accident 5 killed
Share on Social Sites

पुणे । Pune :

राज्यात गेल्या काही दिवसांत अपघाताची मालिका सुरु आहे. त्यात शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete, Shiv Sangram Sangathan) यांचेही अपघाती निधन झाले. तर, आज (दि. 17) बीड जिल्ह्यातच आणखी एका अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताच्या घटना थांबताना दिसत नाहीत. बुधवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात (Pune-Ahmadnagar highway accident) झाला आहे. त्यामध्ये, 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. (Four wheeler car and truck accident on Pune-Ahmadnagar highway 5 people died on the spot)

चुकीच्या दिशेने प्रवास करत असलेला ट्रक अचानक रोडच्या मधोमध आल्याने कारची आणि ट्रकची जोरदार धडक झाली. त्यामध्ये, कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे.

अपघातामध्ये संजय भाऊसाहेब म्हस्के (वय 53), राम भाऊसाहेब म्हस्के (वय 45), राम राजू म्हस्के (वय 7), हर्षदा राम म्हस्के (वय 4 वर्षे), विशाल संजय म्हस्के (वय 16) वर्ष यांचा मृत्यू झाला असून साधना राम म्हस्के या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.

See also  'त्यांचा' सत्तेचा फॉर्म्युला ठरलायं! 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री पदे, केंद्रातही वाटा अन् बरचं काही...

रांजणगाव एमआयडीसीतील (Rangangaon MIDC) एलजी कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला. या कारमधील सर्व प्रवासी पनवेलला (Panvel) जात होते, अशी प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. क्रेनच्या सहाय्याने वाहनं हटविण्यात आली आहेत.

See also  धक्कादायक! 'The Kashmir Files' पाहून आलेल्या तरुणाचा मेंदूतील नस फुटून मृत्यू

Share on Social Sites