आकाशात दिसलेल्या रहस्यमयी आगीच्या गोळ्या संदर्भात अपडेट, सापडले अवशेष

आकाशात दिसलेल्या रहस्यमयी आगीच्या गोळ्या संदर्भात अपडेट, सापडले अवशेष l Meteor shower or Satellite pieces found Chandrapur district Maharashtra
आकाशात दिसलेल्या रहस्यमयी आगीच्या गोळ्या संदर्भात अपडेट, सापडले अवशेष l Meteor shower or Satellite pieces found Chandrapur district Maharashtra
Share on Social Sites

चंद्रपूर l Chandrapur :

शनिवारी (दि. 03) रात्री महाराष्ट्र (Maharashtra) आणि मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अनेक भागात लोकांनी आकाशात रहस्यमयी आगीचा गोळा पडताना पाहिला. आकाशातील हे अद्भूत दृश्य महाराष्ट्रातील नागपूर (Nagpur), चंद्रपूर (Chandrapur), अकोला (Akola), जळगाव (Jalgaon) आदी जिल्ह्यांत पाहायला मिळाले.

अशात चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपार (Pawanpar) गावात आकाशातून पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग गवसला आहे. सुमारे साडेपाच किलो वजनाचा धातूचा गोळा आढळला. लाडबोरी (Ladbori) गावातील शेतात धातूचे मोठे तुकडे आढळून (Meteorite or satellite pieces) आले. यातला एक गोल तुकडा सगळ्यात मोठा आहे.

‘यांनी मशिदीचे भोंगे नाही काढले तर…’; राज ठाकरेंचा थेट इशारा : वाचा भाषणातील ठळक मुद्दे

पवनपार लगतच्या जंगलात हा गोळा आढळल्याची स्थानिक ग्रामस्थांनी माहिती दिली आहे. प्रशासनाने स्थानिकांशी संपर्क साधत घटनेची माहिती घेतली. जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात (Sindevahi Taluka) लाडबोरी गावलगतच्या शेतात उपग्रह वा यानाचे तुकडे पडले.

लाडबोरी गावात कोसळलेल्या रिंग सदृश्य वस्तूचा अभ्यासकांनी आढावा घेतला आहे. हा मोठा तुकडा एखादा निकामी उपग्रह वा यानाच्या इंधन टाकीचा तुकडा असावा एवढा मोठा आहे. याशिवाय अन्य धातूचे तुकडेही शेतात पडले आहे.

https://twitter.com/ANI/status/1510515706160291840

See also  ...तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय; फडणवीसांनाही होती कल्पना?

न्यूझीलंड देशातून प्रक्षेपित झालेल्या रॉकेटचा बूस्टर पार्ट असल्याचा प्राथमिक कयास वर्तवला जात आहे. (Booster part of a rocket launched from New Zealand) मात्र इस्रो (Indian Space Research Organization ISRO) अथवा अन्य कुठल्याही अंतराळ संशोधन यंत्रणेने अशा पद्धतीने कुठली वस्तू पडली असावी याबाबत अधिकृत खुलासा केलेला नसल्याचे लक्षात आणून दिले आहे. सद्य पोलिसांनी हे तुकडे ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे..

लाडबोरी येथे धातूच्या पत्र्याचे मोठे तुकडे आढळून आल्यामुळे हा प्रकार उल्कापाताचा नसल्याचेही म्हटले जात आहे. शनिवारी रात्री चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आकाशात अनोखे दृश्य पाहायला मिळाले. अनेकांनी हे दिव्य दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर केले. काही वेळातच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले.

https://twitter.com/OsintUpdates/status/1510316964069404673

See also  'असा' झाला डॉ. सुवर्णा वाजे यांचा खुनाचा उलगडा; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Share on Social Sites