MPSC Recruitment 2022 : MPSC मध्ये ‘या’ पदासाठी बंपर भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती

Latest MPSC Recruitment News
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

सरकारी नोकरीच्या (Maharashtra Goverment Jobs) शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मध्ये (Maharashtra Public Service Commission MPSC) नोकरीची मोठी संधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी पदाच्या (MPSC Medical Officer Recruitment 2022) 427 रिक्त जागांसाठी उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत महाराष्ट्र राज्य मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयांमधील (Maharashtra State Medical Colleges and Hospital) रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया दि. 25 जुलैपासून 2022 सुरु होणार आहे. अर्ज करण्याची लिंक सुरु झाल्यानंतर उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतील. त्यासाठी उमेदवारांना mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

https://twitter.com/mpsc_office/status/1550472827316252672

अर्ज करण्यासाठीची पात्रता काय ?

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कारावा लागेल. दि. 25 जुलैपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापिठातून एमबीबीएसची (Bachelor of Medicine, Bachelor of Surgery MBBS) पदवी प्राप्त केलेली असावी. शिवाय इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षा दरम्यान असणे आवश्यक आहे.

See also  राजद्रोहाच्या कलमाला स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय : काय आहे ब्रिटीशांच्या काळातील राजद्रोहाचा कायदा? जाणून घ्या!

कशी असेल निवड प्रक्रिया ?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी पदाच्या (Medical Officer Recruitment 2022) 427 रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. जास्त अर्ज आल्यास निवडीसाठी परीक्षा घेतली जाऊ शकते.

अर्जाचे शुल्क किती ?

या भरतीसाठी सर्वसाधारण श्रेणीसाठी अर्जाचे शुल्क 394 रुपये आणि आरक्षित श्रेणीसाठी अर्जाचे शुल्क 294 रुपये आहे

See also  Shivjayanti 2022 : शिवजयंती बाबत राज्य सरकारची नियमावली जाहीर; असे असतील नियम

Share on Social Sites