
मुंबई l Mumbai :
एकनाथ शिंदेंचं बंड (Eknath Shinde’s revolt) आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यात (Maharashtra News) सुरू अभूतपूर्व गोंधळ या सगळ्याची चर्चा आता संपूर्ण देशभरात होत आहे. शिवसेनेच्या (Shivsena) इतिहासात सर्वात मोठा धक्का पक्षाला यावेळी बसला आहे. यामुळे सेनेसोबतच पर्यायाने महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) धोक्यात येण्याची शक्यता कमालीची वाढली आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या (Maharashtra Politics crisis) अनुषंगाने देशभरात बैठकांचा सपाटा सुरू आहे. (Maharashtra Politics)
https://twitter.com/ss_suryawanshi/status/1540601523801313280
आता गल्ली ते दिल्ली पर्यंत भाजपच्या गोटातही खलबतांना सुरुवात झाली. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या हिंदूत्वाचा (Hindutva) मुद्दा पुढे करत खरी शिवसेना त्यांचीच असल्याचा मोठा दावा केला.
यामुळे खरी शिवसेना कोणाची, हा पेच आता कमालीचा वाढला आहे. दोन्ही गटांनी कायदेशीर लढाईला सुरुवात केली आहे. त्याआधीच शिंदे गटाने आज (दि. 25) त्यांच्या नव्या गटाचं नाव ठरवलंय. यासंबंधी संध्याकाळी अधिकृत घोषणा होणार आहे. (Eknath Shinde declared name of his Shivsena Balasaheb Thackeray party)
सारे काही सत्तेसाठीच! राज्यातील सत्तासंघर्षात आता फक्त ‘हे’ दोनच पर्याय शिल्लक
शिंदे गटाचं नाव ठरलयं, मात्र अस्तित्वाची लढाई कायम
एकनाथ शिंदे यांचा गट वारंवार खरी शिवसेना आमची असल्याचं म्हणत आहे. उद्धव ठाकरे (CM Udhhav Thackeray) सरकारमध्ये गेल्यानंतर त्यांनी हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड केली. यानंतर खरी शिवसेना (Shiv Sena) कोणाची, असा प्रश्न उपस्थित होतो. आज संध्याकाळी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ (Shivsena Balasaheb Thackeray), असं या नव्या गटाचं नाव असणार आहे. पक्ष कोणाचा ही लढाई यामुळे तीव्र होणार असं स्पष्ट झालं आहे.
‘त्यांचा’ सत्तेचा फॉर्म्युला ठरलायं! 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री पदे, केंद्रातही वाटा अन् बरचं काही…