Maharashtra BJP 12 MLA Suspension : ठाकरे सरकारला झटका; भाजपाच्या ‘त्या’ १२ आमदारांचे निलंबन रद्द

भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आले आहे. l Maharashtra BJP 12 MLA Suspension cancelled Supreme Court
भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आले आहे. l Maharashtra BJP 12 MLA Suspension cancelled Supreme Court
Share on Social Sites

मुंबई/नवी दिल्ली l Mumbai/New Delhi :

भाजपाच्या (BJP) १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) रद्द करण्यात आले आहे. इतर मागासवर्गीयांचे (Other Backward Classes (OBC) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता.

अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. यानंतर याप्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय असंवैधानिक असल्याचं सांगत निलंबन रद्द केले.

महाराष्ट्र विधानसभेत ठराव करत भाजपाच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. यावेळी भास्कर जाधव पीठासीन अधिकारी होते. त्यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केल्याने हे निलंबन करण्यात आले होते. दरम्यान, यानंतर निलंबित आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुनावणी सुरु होती. दरम्यान आज अखेर न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे.

न्यायालयाने आमदारांना निलंबित करण्याचा ठराव असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. तसेच निलंबन करायचे होते तर ते फक्त एका अधिवेशनापुरतेच असायला हवे होते असेही सांगितले. न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपाच्या आमदारांना दिलासा मिळाला आहे.

See also  ड्राई फ्रूट व्यावसायिकाला ९ लाखांचा Online गंडा

सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारवर ओढले होते ताशेरे (The Supreme Court says Thackeray government)

गेल्या सुनावणीत हा निर्णय लोकशाहीला धोका देणारा आणि तर्कहीन असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. खंडपीठाने महाराष्ट्र राज्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आर्यमा सुंदरम (Senior Advocate Aryama Sundaram) यांना अधिवेशनाच्या कालावधीनंतरच्या निलंबनाच्या तर्कसंगतीबद्दल कठोर प्रश्न विचारले होते.

न्यायमूर्ती खानविलकर यांनी म्हटले होते की, “तुम्ही जेव्हा म्हणता की कारवाई न्याय्य असावी, तेव्हा निलंबनामागे काही हेतू असला पाहिजे आणि तो उद्देश अधिवेशनाच्या संदर्भात आहे. ती कारवाई त्या सत्राच्या पुढे जायला नको, याशिवायचं सर्वच तर्कहीन असेल. खरा मुद्दा निर्णयाच्या वाजवीपणाचा आहे आणि त्यासाठी तेवढे मोठे कारण असायला हवे. ६ महिन्यांहून अधिक काळ मतदारसंघापासून वंचित राहिल्यामुळे तुमचा १ वर्षाचा निर्णय तर्कहीन आहे. आता आपण संसदीय कायद्याच्या भावनेबद्दल बोलत आहोत”.

न्यायमूर्ती सीटी रविकुमार (Justice CT Ravikumar) म्हणाले होते की, “निवडणूक आयोगाला आणखी एक गोष्ट आढळली. ती अशी की ज्या मतदारसंघात जागा रिक्त असेल तिथे निवडणूक होईल. पण निलंबन झाल्यास निवडणूक देखील होणार नाही, परंतु एखाद्या व्यक्तीची हकालपट्टी झाल्यास निवडणूक घेतली जाईल. हा लोकशाहीला धोका आहे. एकाचवेळी १५/२० लोक निलंबित झाले तर लोकशाहीचे भवितव्य काय असेल?”.

https://twitter.com/ANI/status/1486929854855794688?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1486929854855794688%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fsupreme-court-quashes-one-year-suspension-from-the-maharashtra-legislative-assembly-of-12-bjp-mla-sgy-87-2779719%2F

See also  Big News : मालेगावात राष्ट्रीय काँग्रेसला 'दे धक्का'; २७ नगरसेवकांची एकाच वेळी सोडचिठ्ठी

कशामुळे झाले होते १२ आमदारांचे निलंबन ? (What caused the suspension of 12 MLAs?)

राज्याच्या पावसाळी अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यांनतर सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदार आमनेसामने देखील आले. तर, अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. यामध्ये अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), राम सातपुते (Ram Satpute), आशिष शेलार (Ashish Shelar), संजय कुटे (Sanjay Kut), योगेश सागर (Yogesh Sagar), किर्तीकुमार बागडिया (Kirti Kumar Bagdia), गिरीश महाजन (Girish Mahajan), जयकुमार रावल (Jayakumar Rawal), अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar), पराग अळवणी (Parag Alvani), नारायण कुचे (Narayan Kuche), हरीश पिंपळे (Harish Pimple) या आमदारांचा समावेश होता. या सर्व निलंबन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

See also  शिंदें ऐवजी माझ्यासोबत चर्चा करा.. उद्धव यांचा फडणवीसांना फोन; मोदी-शाह नॉट रिचेबल

Share on Social Sites