
रांची l Ranchi :
झारखंड राज्याच्या (Jharkhand) देवघरमध्ये त्रिकुट पर्वताच्या (Trikut Mountain, Deoghar) ‘रोपवे’ मध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफ टीम (NDRF team) काम करित आहे.
राज्य सरकारने मागणी केल्यावर भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) हेलिकाॅप्टरच्या मदतीने अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी आणले जाईल. जवळपास सहा लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
The operation of #NDRF and #Army is going on in the #Ropeway accident in #Trikut, #Deoghar #Jharkhand 48 people are hanging in the air. 8 people have been rescued so far. There is news of the death of 2 women. pic.twitter.com/Z2F25acHHR
— Rajan Kumar Jha (@RealRajanjha) April 11, 2022
एनडीआरएफ टीम बचाव कार्यात (NDRF team in rescue operation)
आयटीबीपी (ITBP), भारतीय लष्कर (Indian Army) आणि एनडीआरएफ टीम त्रिकूट पर्वतावर पोहोचले आहेत. हेलिकाॅप्टरच्या मदतीने फसलेल्या सर्व पर्यटकांना सुखरुप ट्राॅलीने खाली उतरवले जाईल. (Jharkhand Accident On Trikut Mountain Tourists Trapped In Ropeway)
#Jharkhand: Two women died & 8 others people injured in Ropeway accident on Trikut mountain of #Deoghar distt Jharkhand.
About 48 tourists are trapped in Twelve different trolleys at a Height of 2000feet since last 16 hours…#jharkhandnews pic.twitter.com/gCAdqZZFul
— Siraj Noorani (@sirajnoorani) April 11, 2022
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की… (Jharkhand Chief Minister Hemant Soren)
झारखंडच्या देवघरमध्ये झालेल्या रोपवे दुर्घटनेवर (Ropeway Accident) राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले, की एनडीआरएफ (NDRF), भारतीय वायसेना आणि गरुड कमांडो (Garuda Commando) आदींची मदत घेतली जात आहे. ज्यांनी रोपवे बनवला होता, ती टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. लोकांना वाचवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. सर्व हालचालींवर सरकारचे बारीक लक्ष आहे. देवघर जिल्ह्यातील मोहनपूर (Mohanpur) येथील त्रिकूट पर्वतावरील रोपवेमध्ये अचानक बिघाड झाल्याने ४८ पर्यटक ट्राॅलीत अडकले आहेत.
त्यांना सुरक्षितरित्या खाली आणण्यासाठी एनडीआरएफची टीम जिल्हा प्रशासनाबरोबर समन्वय साधून बचाव कार्य करित आहे. या दुर्घटनेत दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. रोपवेत अडकलेल्या पर्यटकांना वारंवार धीर ठेवण्यास सांगितले जात आहे.
त्यांना सुरक्षितरित्या खाली आणण्यासाठी एनडीआरएफची टीम जिल्हा प्रशासनाबरोबर समन्वय साधून बचाव कार्य करित आहे. या दुर्घटनेत दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. रोपवेत अडकलेल्या पर्यटकांना वारंवार धीर ठेवण्यास सांगितले जात आहे.
…अन् किर्तनकार बाबाचा Porn Video असा झाला तुफान व्हायरल; खरं कारण आलं समोर