Ganesh Chaturthi 2022 : बाप्पांच्या आगमनासोबतच होत आहे शुक्राचे गोचर, ‘या’ चार राशींवर असते गणरायाची विशेष कृपा

Share on Social Sites

मुंबई । Mumbai :

आज म्हणजेच दि. 31 ऑगस्टला घराघरात बाप्पांचे आगमन होणार आहे. या दिवशी भक्त घरोघरी गणरायाच्या मूर्तीची स्थापना करतात. गणेशोत्सव 10 दिवस साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi) दिवशी गणरायाचं विसर्जन केलं जात.

गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवशी शुक्रही आपली राशी बदलणार (Venus Transit) आहे. दि. 31 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह आपली राशी बदलून सिंह राशीत (Leo sign) प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे आणि तो सिंह राशीमध्ये आधीपासूनच आहे.

दुसरीकडे ज्योतिषशास्त्रात, शुक्र ग्रह (Venus sign) हा संपत्ती, सौंदर्य, प्रेमाचा कारक मानला जातो, तर दुसरीकडे, सूर्य हा यश, आत्मविश्वास, आरोग्य इत्यादींचा कारक मानला जातो. अशा स्थितीत गणेश चतुर्थीला सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे सर्व 12 राशींवर परिणाम होईल, परंतु या 4 राशीच्या लोकांवर श्रीगणेशाची विशेष कृपा राहणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

Ganesh Chaturthi 2022 : कधी आणि कशी कराल गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना; जाणून घ्या पूजा तयारी, शुभ मुहूर्त, विधी आदींबाबत

मिथुन (Gemini Horoscope Today) :

मिथुन राशीचे स्वामित्व बुध ग्रहाकडे आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा कालावधी उत्तम ठरण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांसाठी व्यवसाय आणि करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायात एक मोठी डीलही होऊ शकते. कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी वातावरण शांत राहिल आणि श्रीगणेशाच्या कृपेने सर्व अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शुभ माहिती मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांशीही मधूर संबंध राहतील.

कर्क (Cancer Horoscope Today) :

कर्क ही चंद्राची रास आहे. चंद्राने आपली चूक सुधारून श्रीगणेशाचे वरदान मिळवले. त्यामुळे कर्क राशीवरही गणेशाची कृपा आहे. या वर्षी गणेश चतुर्थीला चंद्र कन्या राशीत आणि नंतर तूळ राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत गणेशाच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांना बुद्धिमत्ता आणि कौशल्याचा फायदा होईल. मातृपक्षाकडूनही लाभाची संधी मिळेल. या राशीच्या लोकांना अल्प मुदतीच्या गुंतवणुकीमुळेही फायदा होण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo Horoscope Today) :

कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी हा कालावधी अनुकूल परिणाम देणार आहे. नोकरदार लोकांवर श्रीगणेशाची विशेष कृपा असेल, त्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये चांगली वाढ होऊ शकते. या काळात भाऊ-बहिणीचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि संबंधही सौहार्दपूर्ण राहतील. गणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग खुले होतील. या काळात तुमचा सामाजिक लोकांशी संवाद वाढेल आणि काही नवीन मित्रही बनतील.

तूळ (Libra Horoscope Today) :

या वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र तूळ राशीत प्रवेश करेल. तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. तूळ राशीच्या लोकांवर श्रीगणेशाची कृपा राहील. या कालावधीत तूळ राशीच्या लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूही सुधारु शकते. या कालावधीत अचानक धनलाभही संभवतो. कला आणि रचनात्मक क्षमता विकसित होतील. या राशीच्या कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळेल आणि लाभाची संधी मिळू शकते.

सिंह राशीत शुक्राच्या संक्रमणाची वेळ (Transit time of Venus in Leo)

सिंह राशीतील शुक्राचे संक्रमण बुधवार, दि. 31 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 04:09 वाजता होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह जल तत्व कर्क राशीपासून सिंह राशीत अग्नि तत्वात प्रवेश करेल. सिंह हा शुक्रासाठी शत्रूसारखा आहे, अशा स्थितीत परिस्थिती फारशी अनुकूल मानली जात नाही, खरे तर शुक्र आणि सिंह राशीमध्ये अनेक साम्य आहेत, त्यामुळे ही परिस्थिती फलदायी ठरू शकते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

See also  Kargil Vijay Diwas 2022 : कारगिल विजय दिनाचं महत्वं आणि इतिहास, 60 दिवस चाललेल्या युद्धात अखेर पाकिस्तान हरले

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Today’s Horoscope : जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशी मंथन, रविवार, 14 ऑगस्ट 2022

Share on Social Sites