
नवी दिल्ली l New Delhi :
जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांपैकी एक असलेल्या ट्विटरची आता विक्री झाली आहे. (Elon Musk Buys Twitter) जगातील प्रसिद्ध श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर (Twitter) विकत घेतलं आहे.
एलॉन मस्क (Elon Musk) यांनी काही काळापूर्वी ट्विटरमध्ये 9% हिस्सेदारी विकत घेतली होती. आता मस्क यांनी ट्विटर इंकचा 100% हिस्सा विकत घेतला आहे. त्यांनी ट्विटर कंपनी $54.20 प्रति शेअर या दराने विकत घेतली आहे. (Elon Musk bought Twitter)
#twittersold
Elon Musk bought twitter for 3lakhs Crore ($44 billion).
New CEO of Twitter #ElonMusk #TwitterTakeover #TwitterCEO pic.twitter.com/hGC5gfRwq1— Rojer Matz (@RojerMatz) April 26, 2022
गेल्या काही आठवड्यांपासून ट्विटर कंपनी एलॉन मस्क यांच्या ऑफरवर विचार करत होती. आता बोर्डाची संमती मिळाल्यानंतर कंपनीने ट्विटरची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्विटरच्या स्वतंत्र मंडळाचे अध्यक्ष ब्रेट टेलर (Brett Taylor, Chairman of Twitter’s independent board) म्हणाले : “ट्विटर बोर्डाने मूल्य, निश्चितता आणि वित्तपुरवठा या एलॉनच्या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार केला आहे. करारानंतर, ट्विटरच्या सर्व भागधारकांना रोखीने चांगला प्रीमियम मिळेल, ज्याचा फायदा भागधारकांना होईल. आम्हाला वाटतं की, ट्विटरच्या शेअरहोल्डरसाठी (Twitter Shareholders) ही एक उत्तम संधी आहे.”
KGF Chapter 2 : ‘रॉकीभाई’ ची रॉकिंग कमाई! ‘केजीएफ चॅप्टर 2’ ने पार केला कमाईचा थक्क करणारा आकडा
ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Twitter CEO Parag Agarwal) म्हणाले, “ट्विटरचा एक उद्देश आणि प्रासंगिकता आहे ज्याचा संपूर्ण जगावर परिणाम होतो. आम्हाला आमच्या टीमचा मनापासून अभिमान आहे.
कंपनीचे नवीन मालक एलॉन मस्क म्हणाले, ‘भाषण स्वातंत्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे. ट्विटर हे असंच एक डिजिटल टाउन आहे, जिथे मानवतेच्या भविष्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाते.
ट्विटरमध्ये प्रचंड क्षमता आहे. मला त्यात नवीन वैशिष्ट्ये जोडून ते पूर्वीपेक्षा चांगलं बनवायचं आहे. मी कंपनीसोबत काम करण्यास उत्सुक आहे. ते अनलॉक केल्याबद्दल मी वापरकर्त्यांचे आभार मानतो.’
#TwitterSold @elonmusk …! pic.twitter.com/b1NATNMH8M
— Imran Ansari (@ImranAnsari0007) April 25, 2022