
मुंबई l Mumbai :
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Veteran actor Ramesh Deo) यांचे आज (दि. ०२) ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते.
चारच दिवसांपूर्वी (दि. ३)० जानेवारी रोजी त्यांनी आपला ९३वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनामुळे मराठी (Marathi Films) आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून (Bollywood) शोक व्यक्त करण्यात येत आहे.
https://twitter.com/NFAIOfficial/status/1120275738391908352?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1120275738391908352%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fveteran-actor-ramesh-dev-passed-away-marathi-industry-bollywood-movies-pmw-88-2787643%2F
रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक (Hero), खलनायक (Villain) अशा दोन्ही भूमिका साकारल्या. १९५१ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पाटलाची पोर (Patlachi Por) या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. १९५६ साली राजा परांजपे (Raja Paranjape) यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ (Andhala Magato Ek Dola) या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
राजश्री प्रोडक्शनच्या (Rajashri Production) १९६२ साली आलेल्या आरती (Aarti) या सिनेमातून त्यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. रमेश देव यांनी आजपर्यंत जवळपास १८० हून अधिक मराठी (Marathi Film) आणि हिंदी चित्रपटांमध्ये (Hindi Film) भूमिका साकारल्या आहे.
२०१३ साली रमेश देव यांना ११व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (Lifetime Achievement Award at the 11th Pune International Film Festival)
पाटलाचे पोर(Patlachi Por), सुवासिनी (Suvasini), झेप (Zep), अपराध (Apradh), सर्जा (Sarja), या सुखांनो या (Ya Sukhanno Ya), आनंद (Anand), कसौटी (Kasauti), फटाकडी (Fatakadi), जय शिवशंकर (Jay Shivshankar), तीन बहुरानियाँ (Tin Bahuraniyan) असे त्यांचे अनेक गाजलेले सिनेमे प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते.
Nashik Crime : असा झाला ‘त्या’ खुनाचा उलगडा; पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा
याशिवाय अनेक नाटके आणि मालिकांमधून देखील त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. २००६ साली आलेल्या निवडुंग (Nivdung) या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती.
पोलीस बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे; देशमुख यांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात एकच खळबळ