
व्हॉट्सअँप चॅटिंग (WhatsApp Chatting), व्हॉट्सअँप व्हिडीओ कॉल (WhatsApp video call) आणि इतर फिचर्स असणाऱ्या व्हॉट्सअँपचा वापर सध्या कोट्यवधी लोक करत आहेत. व्हॉट्सअँपमध्ये वेगवेगळे अपडेट्स येत असतात. (WhatsApp new update) युझर फ्रेंडली असणाऱ्या या अँपमध्ये वेगवेगळे ग्रुप्स तयार करण्याचं देखील फिचर आहे. कुटुंबातील सदस्यांचा तसेच मित्रांचा ग्रुप, ऑफिसमधील सहकाऱ्यांचा ग्रुप या ग्रुप्समध्ये अँड झाल्यानंतर अनेक फॉरवर्ड मेसेज तुम्हाला लोक पाठवत असतील.
https://twitter.com/WhatsApp/status/1557004130283044866
पण बऱ्याच वेळा या ग्रुप्समधून लेफ्ट होता येत नाही म्हणजेच बाहेर पडता येत नाही. आता व्हॉट्सअँपमध्ये एक नवे फिचर येत आहे. या फिचरमधून सायलेंटली ग्रुप लेफ्ट करु शकता. म्हणजे जर तुम्ही ग्रुप लेफ्ट केला तर ग्रुपमधील सदस्यांना ते कळणार देखील नाही. व्हॉट्सअँपमध्ये आणखी काही फिचर्सचा समावेश होणार आहे. जाणून घेऊयात या नव्या फिचर्सबाबत… (WhatsApp announces new privacy features)
तुम्ही ऑनलाइन आहात की नाही? हे सेलेक्टेड युझर्स पाहू शकतात व्हॉट्सअँपचे हे नवे फिचर या महिन्यात येऊ शकते. यामध्ये तुम्ही ऑनलाइन आहात की नाही? हे सेलेक्टेड युझर्स पाहू शकणार आहेत. तुम्ही व्हॉट्सअँपमध्ये ‘ऑनलाइन’ (Online) स्टेटस इंडिकेटर सेट करु शकता. तुम्ही ऑनलाइन आहात की नाही? हे तुम्ही निवडलेल्या युझर्सलाच फक्त कळेल.
https://twitter.com/WhatsApp/status/1557004133428862976
सायलेंटली करु शकता ग्रुप लेफ्ट (WhatsApp’s New Privacy Features Will Let You Quietly Leave Group Chats)
जर एखाद्या ग्रुपमधून तुम्हाला लेफ्ट व्हायचं असेल तर तुम्ही सायलेंटली ग्रुप लेफ्ट करु शकता. (Silently leave WhatsApp group) या फिचरमध्ये तुम्ही जर ग्रुप लेफ्ट केला तर ते इतरांना कळणार नाही. पण तुम्ही ग्रुप लेफ्ट केल्यानंतर ग्रुप अँडमिनला नोटिफिकेशन जाऊ शकते. हे फिचर देखील या महिन्यात येऊ शकते.
मेसेजचा स्क्रीनशॉट घेण्यावर निर्बंध (WhatsApp will block you taking screenshots of chats)
व्हॉट्सअँपच्या ‘व्हॉट्सअँप व्यू वन्स’ (WhatsApp View Once) या मेसेजचा स्क्रीनशॉट आता युझर्स घेऊ शकणार नाहीत. व्हॉट्सअँप व्हू वन्स मेसेज तुम्ही एकदाच पाहू शकता. आता स्क्रीनशॉट ब्लॉक करण्याचे नवे फिचर व्हॉट्सअँप लाँच करणार आहे. या फिचर नुसार तुम्ही स्क्रीनशॉट ब्लॉक हा पर्याय निवडू शकता. यामुळे युझर कोणत्याही ‘व्हॉट्सअँप व्हू वन्स’ मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. मार्क झुकरबर्गने (Mark Zuckerberg) देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या नव्या फिचर्सची माहिती दिली होती.