
मराठी टेलिव्हिजनच्या सर्वोत्कृष्ट कॉमेडी स्टार्सपैकी (Comedy star of Maharashtra) एक म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारने (Marathi actress Vishakha Subhedar) ‘महाराष्ट्राची हास्याजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra) या रिॲलिटी शोद्वारे प्रसिद्धी मिळवली.
विशाखाने तिच्या दमदार अभिनय कौशल्याने गेल्या 4 वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. आता महाराष्ट्राची हास्याजत्रा या कार्यक्रमाचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या नव्या सिझनमध्ये कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार दिसणार नाही.
फू बाई फू (Fu Bai Fu), कॉमेडीची बुलेट ट्रेन (Comedychi Bullet Train), महाराष्ट्राची हास्यजत्रा यांसारख्या शोजमधून तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. एप्रिल महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने हास्यजत्रेचा निरोप घेत असल्याचं जाहीर केलं होतं.
https://www.facebook.com/vishakha.subhedar/posts/5239020599474749
‘दरवेळेस स्किट झाल्यावर किंवा होण्याआधीच टेंशन भयानक असत. कालच्यापेक्षा चांगलं करायचं, त्या टेन्शनमधून काहीकाळ बाहेर पडतेय. एक छान, उत्तम रंगवता येईल अशी भूमिका, मग ती फिल्म मधली 20/25 दिवसांच्या प्रवासाची किंवा नाटक 500 ते 1000 प्रयोगाची, किंवा मग सिरीयल मधली असो, मला या वाटेवरचा प्रवास सुरु करायचा आहे,’ असं म्हणत तिने हास्यजत्रेचा प्रवास थांबवला होता.
“होय, महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या नव्या सिझनमध्ये विशाखा सुभेदार (Maharashtrachi Hasya Jatra Vishakha Subhedar) सहभागी होणार नाही. विशाखाने हा शो सोडला असून प्रेक्षकांना तिची खूप आठवण येईल. नव्या सिझनमध्ये इतर बरेच कॉमेडियन्स असतील, जे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतील. येत्या 15 ऑगस्टपासून हा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येईल”, अशी माहिती शोच्या सूत्रांनी दिली आहे. हास्यजत्रा सोडल्यानंतर विशाखा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravhav) ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyaya Rangoli) या मालिकेत भूमिका साकारताना दिसतेय.
या नव्या सिझनमध्ये समीर चौघुले (Sameer Chowghule), नम्रता संभेराव (Namrata Sambherao), प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar), ओमकार भोजने (Omkar Bhojane), गौरव मोरे (Gaurav More) हे सहभागी होतील. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा- चार वार हास्याचा चौकार’ (Maharashtrachi Hasya Jatra- Char Var Hasyacha Chaukar) असं या नव्या सिझनचं नाव आहे.