Timepass 3 box office collection : दगडू आणि पालवीची लव्हस्टोरी ‘हिट’ की ‘फ्लॉप’?, ‘टाइमपास 3’ चे कलेक्शन आले समोर

Share on Social Sites

मुंबई । Mumbai :

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला भन्नाट मराठी चित्रपट टाईमपास 3 (Timepass 3 Marathi Movie) अखेर प्रदर्शित झाला आहे. यातील गाणी आणि संवादाची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसते. यात मुख्य भूमिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे (Actress Hruta Durgule) आणि अभिनेता प्रथमेश परब (Actor Prathamesh Parab) असून त्यांनी ‘पालवी’ (Palvi) आणि ‘दगडू’ (Dagdu) ही पात्रं साकारली आहेत. ‘दोन नंबर लव्हचा हा एक नंबर लोचा’ (Don number Lovecha, Ek number Locha) असं म्हणणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय का हेही पाहणे महत्वाचे आहे. या चित्रपटाने चार दिवसात केलेली कमाई नुकतीच समोर आली आहे. (Timepass 3 box office collection)

रवी जाधव (Director Ravi Jadhav) दिग्दर्शित ‘टाईमपास 3’ शुक्रवारी दि. 29 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सध्या जोरदार प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांपासून ते मान्यवरांपर्यंत अनेक चित्रपटांनी याचे कौतुक केले आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळेचा चित्रपटातील बिनधास्त, काहीसा मवाली अंदाज पासून चाहते भलतेच खुश झाले आहेत.

प्रेम, विनोद, संवेदना, भावनिकता आणि मस्तीभरा असा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने चार दिवसात जवळपास 4.36 कोटींची कमाई केली आहे. नुकतीच यासंदर्भात एक पोस्ट दिग्दर्शक रवी जाधव यांनी शेअर केली आहे. असे असले तरी एक चिंता निर्मात्यांना लागून राहिली आहे (Timepass 3 box office collection Hruta Durgule, Prathamesh Parab, Ravi Jadhav, Sanjay Narvekar, Vaibhav mangle)

See also  शिवसेनेला मोठा धक्का; यशवंत जाधव यांच्या घरी IT विभागाची धाड

या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी 80 लाखांची कमाई केली. दुसऱ्या शनिवारी त्यात वाढ होऊन दोन दिवसांची कमाई 1 कोटी 90 लाखांची कमाई केली आहे. रविवारी या प्रतिसादात आणखी वाढ झाली आणि सोमवार अखेर एकूण कमाई 4.36 कोटी रुपये इतकी झाली. ही आनंदाची बातमी रवी जाधव यांनी सोशल मीडियावर दिली.

असे असले तरी आगामी काळात इतर चित्रपटांशी असलेली स्पर्धा आणि चित्रपटाचा निर्मिती खर्च याचे गणित पाहून निर्माते चिंतेत आहेत. असं म्हणतात, या चित्रपटाचा एकूण निर्मिती खर्च हा अंदाजे 10 कोटी रुपये इतका आहे. त्यामुळे तो भरून काढण्यासाठी या चित्रपटाच्या कमाईत वाढ होणं गरजेचे आहे. त्यामुळे हा चित्रपट हीट ठरला की फ्लॉप हे लवकरच समोर येणार आहे.

See also  Nashik : महसूल अधिकारी RDX, दंडाधिकारी Detonator; नाशिक पोलीस आयुक्तांचा Letter Bomb

Share on Social Sites