
नंदुरबार l Nandurbar :
राज्यातील नंदूरबार रेल्वे स्टेशन (Nandurbar Railway Station) वर गांधीधाम-पुरी रेल्वेला बोगीला (Gandhidham-Puri Railway Bogie) भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी नागरिकांसह रेल्वेप्रशानाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, गांधीधाम पुरी १२९९३ रेल्वे (Gandhidham Puri 12993 Train) आज (दि. २९ जानेवारी) सकाळी ०७.५० वाजता सुरत येथून निघाली.
https://twitter.com/ekhabarbat/status/1487315235816222723
नंदूरबार रेल्वे स्थानकावर ती रेल्वे १०.१० मिनिटांनी पोहचणार होती. मात्र नंदूरबार रेल्वे स्थानकापासून अवघ्या दीड किमी अंतरावर पेंट्री डब्याला (खानपान) हि आग लागली.
ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी चैन खेचत गाडी थांबविली. यावेळी पोलीस दलासह अग्निशमन दलाला (Fire Brigade) पाचारण करण्यात आले. ११.५० पर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न शर्थीने सुरू होते, आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
https://twitter.com/ANI/status/1487307218299265024