Cyclone Arnab Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अर्नब’ चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला मोठा तडाखा दिला आहे. बुधवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी पहाटे आंध्र प्रदेश आणि यानम किनारपट्टी ओलांडताना या वादळामुळे अनेक भागांत मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि मोठे नुकसान झाले. झाडे आणि विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला असून, रस्ते, घरे आणि उभ्या पिकांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील पूर्व विदर्भासह काही भागांत देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशात चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका (Severe impact of the cyclone in Andhra Pradesh)
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, अर्नब चक्रीवादळाने पहाटे साधारण दोन ते सकाळी आठ या वेळेत आंध्र प्रदेश आणि यानम किनारपट्टी ओलांडली. किनारपट्टीवर धडकताना वाऱ्यांचा वेग ताशी तब्बल १२५ ते १३५ किलोमीटर होता, तर काही झोतांचा वेग ताशी १५० किलोमीटरपर्यंत पोहोचला होता. किनारा ओलांडल्यानंतर वादळाची तीव्रता कमी होऊन ते तीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत आले. विशाखापट्टणम, काकीनाडा, कोनसीमा, पश्चिम गोदावरी आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये वादळाचा परिणाम जाणवला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले आणि सखल भागांत पाणी साचले. काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे वाहतूक आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. किनारपट्टीवरील परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे.
चक्रवात अर्नब की भीषण हवाएं !
चक्रवात अर्नब की भीषण हवाएं चल रही हैं, जिनकी रफ्तार 150 किमी प्रति घंटे तक पहुंच रही है। प्रकृति का प्रकोप साफ दिखाई दे रहा है!
सुरक्षित रहें और स्थानीय मौसम संबंधी चेतावनियों का पालन करें।
#CycloneArnab https://t.co/Fzx9pM6CkR
— Dinesh Lilawat INC (@DineshLilawatIN) October 28, 2026
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
एका वृत्तानुसार, आता पर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला होता. झाडे किंवा विजेचे खांब कोसळणे, विजेचा धक्का लागणे आणि घराची भिंत अथवा झोपडी कोसळणे अशा घटनांमध्ये जीवितहानी झाल्याची माहिती आहे. चक्रीवादळ येण्यापूर्वी किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. विशाखापट्टणम आणि अनाकापल्ली परिसरातून सुमारे ५७ हजार लोकांना हलवण्यात आले आहे.
१५ हजार विजेचे खांब कोसळल्याची माहिती
वादळामुळे वीज वितरण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. आंध्र प्रदेशात सुमारे १५ हजार विजेचे खांब उन्मळून पडले. राज्य सरकारने मदतकार्य आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सुमारे ३० हजार सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावल्याचीही माहिती आहे. कोनसीमा आणि पश्चिम गोदावरीसारख्या काही जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. विशाखापट्टणमसह काही भागांत झाडे पडल्याने रस्त्यांवर अडथळे निर्माण झाले. काकीनाडा जिल्ह्यातील उप्पाडा किनारी रस्त्याचे नुकसान झाल्याचेही वृत्त आहे. वादळामुळे समुद्र खवळलेला असल्याने किनारपट्टीवरील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
Cyclone Arnab has left people homeless and shattered countless lives.
Praying for everyone’s safety 🙏
#CyclonArnab #CycloneArnabUpdate https://t.co/Cizf1czWj3
— Spraha Joshi (@sprahajoshi) October 28, 2026
शेतकऱ्यांचे नुकसान ; भातपिकांना फटका
जोरदार वारे आणि पावसामुळे आंध्र प्रदेशातील भातशेती तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे. काही भागांतील भाताची उभी पिके आडवी झाली असून, शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोनसीमा आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांत मोठ्या संख्येने झाडे उन्मळून पडल्याचे राज्य सरकारच्या हवाल्याने वृत्तात नमूद करण्यात आले आहे. चक्रीवादळानंतर बाधित नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. नुकसानग्रस्त कुटुंबे तसेच विणकर आणि मच्छीमारांसाठी मदत देण्याबाबतही राज्य सरकारने घोषणा केल्याचे वृत्त आहे. प्रत्यक्ष नुकसान किती झाले, याचा सविस्तर आढावा पुढील टप्प्यात घेतला जाणार आहे.
Devastating Winds of #CyclonArnab as it landfalls near Andhra Pradesh 🌊🚨⚠️
Cyclone 🌀 Arnab’s wind force is absolutely terrifying.
The sheer power of these winds is unreal.
#CycloneArnab #CycloneDamage
#CycloneAlert https://t.co/rBimpJGiuq— sustainme.in® (@sustainme_in) October 28, 2026
महाराष्ट्रात कुठे पावसाचा अंदाज?
अर्नब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातही काही भागांत पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज असून राज्यातील काही भागांत पुढील तीन दिवस पावसाला पोषक परिस्थिती राहू शकते. गडचिरोली जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता नमूद करण्यात आली आहे.
नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?
वादळी पाऊस सुरू असताना नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. झाडांखाली, विजेच्या खांबांजवळ किंवा तुटलेल्या विद्युत तारांच्या आसपास थांबू नये. पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाहन नेण्यापूर्वी परिस्थितीची खात्री करावी. शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज पाहून शेतीची कामे नियोजित करावीत. अर्नब चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशात झालेले नुकसान आणि महाराष्ट्रातील संभाव्य पावसाची परिस्थिती पाहता, पुढील काही दिवस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

भावांनो तयारीला लागा! राज्यात 7 हजार जागांसाठी होणार जम्बो पोलीस भरती; तपशील घ्य...

Blog (विशेष लेख) : कसयं ना शेठ... 16 ते 18 वर्षाच्या 'रिल्स स्टार'ची जिंदगी

Mahatma Gandhi Jayanti : गांधीजींचे 'हे' 10 प्रेरणादायी विचार, जे देतात जीवनाला ...

