‘या’ सोप्या पद्धतीने बनवा घरच्या घरी केमिकलविरहित Natural Sunscreen

मार्च महिना सुरु होताच उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवायला लागला आहे. सकाळपासूनच उन्ह वाढू लागण्याने घराबाहेर पडणे कठीण झाले अशात त्वचेचे संरक्षण करण्यासाठी घरातून बाहेर पडताना ‘सनस्क्रीन’ लावणे खूप आवश्यक असते.

सनस्क्रीन केवळ Tanning पासूनच नाही तर त्वचेचे नुकसान, जळजळ आणि अकाली वृद्धत्वाच्या लक्षणांपासूनही संरक्षण करत असते. (Homemade Sunscreen for Face)

मात्र आज बाजारात मिळणारे अनेक सनस्क्रीन खूप महाग असतात शिवाय त्यामध्ये केमिकल्सचे प्रमाण हि मोठ्या प्रमाणात असते, जे प्रत्येकाच्या त्वचेला सूट होतीलच असे नाही. अशा परिस्थितीत घरच्या घरी नैसर्गिक घटकांपासून बनवलेले DIY सनस्क्रीन हा सुरक्षित आणि हेल्दी पर्याय नक्की ठरू शकतो.

या लेखात आपण घरच्या घरी नैसर्गिक सनस्क्रीन कसे बनवायचे याची सोपी पद्धत जाणून घेणार आहोत.

Sensitive किंवा Normal स्किनसाठी नैसर्गिक सनस्क्रीन :

आवश्यक साहित्य :

½ कप शीया बटर (Shea Butter)

2 चमचे बीजवैक्स (Beeswax)

2 चमचे व्हर्जिन नारळ तेल (Virgin Coconut Oil)

1 चमचा तिळाचे तेल (Sesame Oil)

थोडेसे, कॅरट सीड ऑईल (Carrot Seed Oil)

लॅव्हेंडर एसेंशियल ऑईल – 4 थेंब (Lavender Essential Oil)

एक बाउल

पंप बाटली

सनस्क्रीन बनवण्याची पद्धत (How to make Sunscreen) :

सर्वप्रथम, एका बाउलमध्ये शीया बटर, नारळ तेल आणि बीजवैक्स घाला.

हा बाउल एका पॅनमध्ये ठेवून कमी आचेवर सर्व साहित्य वितळेपर्यंत गरम करा.

सर्व घटक चांगले मिसळून घ्या आणि मिश्रण थोडे थंड होऊ द्या.

मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात तिळाचे तेल, कॅरट सीड ऑईल आणि लॅव्हेंडर ऑईल घाला.

आता हे मिश्रण ३० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा.

नंतर ते काढून पंप बाटलीमध्ये भरून वापरा.

ड्राय किंवा नॉर्मल स्किनसाठी नैसर्गिक सनस्क्रीन (Natural Sunscreen for dry or Normal Skin)

आवश्यक साहित्य :

¼ कप शीया बटर

2 चमचे व्हर्जिन नारळ तेल

1 चमचा एवोकाडो ऑईल

2 चमचे पिवळे बीजवैक्स

½ चमचा कॅरट सीड ऑईल

½ चमचा रास्पबेरी सीड ऑईल

एक बाउल

पंप बाटली

सनस्क्रीन बनवण्याची पद्धत :

एका बाउलमध्ये बीजवैक्स, नारळ तेल, शीया बटर आणि एवोकाडो ऑईल घाला.

हा बाउल पॅनमध्ये ठेवून कमी आचेवर सर्व घटक वितळेपर्यंत गरम करा.

मिश्रण व्यवस्थित मिसळून थोडे थंड होऊ द्या.

पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात कॅरट सीड ऑईल आणि रास्पबेरी सीड ऑईल मिसळा.

हे मिश्रण ३० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा.

नंतर ते पंप बाटलीमध्ये भरून वापरू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी नेचरल सनस्क्रिन बनवून आपल्या त्वचेचे तीव्र उन्हा पासून आणि घातक केमिकल्स पासून संरक्षण करू शकता.

⚠️ डिस्क्लेमर : ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. आपल्या स्किनकेअर रूटीनमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment